विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Sanjay Shirsat प्रवाहाच्या बाहेर राहणं त्यांना परवडणार नाही. माशासारखा तडफडणार आहे. त्यामुळे ठाकरे गट देखील फडणवीसांच्या प्रेमात पडला आहे. मात्र आमची टाळी मारायची वेळ गेली आहे. आता त्यांची वेळ आहे. त्यांनी टाळी देऊ द्या, आम्ही विचार करू, अशा शब्दांत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करत भाजपलाही इशारा दिला.Sanjay Shirsat
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक केले होते. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून मुख्यमंत्र्यांचे ॲक्टिव्ह आणि कौतुक करण्यात आले होते. ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेटही झाली. त्यानंतर आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचीही भेट झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत चांगल्या गोष्टी ठाकरे यांची शिवसेना बोलू लागली आहे. त्यावरुन एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सवाल केले होते.
याच अनुषंगाने बोलताना शिरसाट म्हणाले, या विषयावर आम्ही कशासाठी चर्चा करायची? त्यांना जाणीव होऊ द्या. त्यांनी टाळी देऊ द्या. आम्ही विचार करू.त्यांच्या सरड्याच्या बदलत्या भूमिका महाराष्ट्र पाहत आहे. त्यांचा पक्ष संपला आहे भवितव्य कुणाला आहे हे सर्वांना माहित आहे.
महाविकास आघाडीत सुरू असलेल्या कलगीतूऱ्यावर बोलताना शिरसाट म्हणाले, महाविकास आघाडी टिकणार नाही. सर्वांनी एकमेकांच्या विरोधात काम केलं आहे. आता ते एकमेकांसोबत राहणार नाहीत. आता उबाठा गटाचे महत्त्वच संपले आहे. मतांची पेटी दूर जात असल्याने ठाकरेंना दूर केलं जात आहे. राष्ट्रवादीला मविआमध्ये राहायचं नाही. शरद पवार यांची राष्ट्रवादी महिनाभारत कुठे आहे हे दिसेल. राष्ट्रवादीला पक्षा बदलायची सवय आहे. महिनाभरात त्यांचा वेगळा अजेंडा दिसेल.शरद पवार अजित पवार यांच्यासोबत येऊ शकतात असे संकेत आहेत.जयंत पाटील त्या पक्षात अधिक काळ राहणार नाही. जयंत पाटील रोहित पवार यांना खुपत आहेत
ठाकरे गटाचे नगरसेवक अनेक वर्षांपासून नाराज आहेत. यामुळे तर आम्ही देखील नाराज होतो. या धोरणामुळे पक्ष रसातळाला गेला आहे, बडबड करणारे करत आहे. नाराज नगरसेवक पर्याय शोधत आहेत. आमच्याकडेही अनेक नेते येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढण्याचे ठरवत असल्याच्या प्रश्नावर शिरसाट म्हणाले, त्यांनी काय भूमिका घ्यावी त्यांचा प्रश्न आहे. आमची भूमिका आहे एमआयएमशी दोन हात करायचे असेल तर एकत्र निवडणुका लढवाव्या लागेल. ते निर्णय घेणार असेल तर आम्ही देखील घेऊ.
Thackeray fraction in love with Fadnavis, let them clap, then we will think, Sanjay Shirsat’s warning to BJP
महत्वाच्या बातम्या
- Jarange Patil : संतोष देशमुख प्रकरणात दगाफटका झाला तर सरकारची गाठ मराठ्यांशी जरांगे पाटील यांचा इशारा
- Vijay Wadettiwar पुण्यातील कायदा सुव्यवस्था उध्वस्त, कडक शिस्तीचा पोलीस कमिशनर आणा, विजय वडेट्टीवार यांची मागणी
- पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून अजित पवार पोलिसांना थेटच म्हणाले…जमत नसेल तर सांगा
- Narayan Rane मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढवेल इतकी भाजपची ताकद, नारायण राणे यांचा विश्वास