विशेष प्रतिनिधी
मुंबई : Thackeray शिवसेना ठाकरे गटाला हादरे सुरूच आहेत. आता ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिलाल माळी यांचा ठाण्यात शिवसेनेत प्रवेश होत आहे. माळी यांच्यासह जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, शहरातील विविध समित्यांवर असलेले कार्यकर्ते ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करत आहेत.Thackeray
कोकणचे नेते राजन साळवी आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्री येथे खंडाजंगी झाल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे धुळे जिल्ह्याचे सह संपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात हिलाल माळी सहभागी होते.
हिलाल माळी यांचा धुळे शहर आणि ग्रामीण मतदारसंघांमध्ये मोठा प्रभाव आहे .शिवसेनेच्या अनेक मोठ्या आंदोलनात हिलाल माळी यांचा सहभाग होता. हिलाल माळी यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांना धुळे ग्रामीणमध्ये मिळेल मोठं बळ मिळणार आहे. हिलाल माळी यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे ठाकरे यांच्या गटाला धुळे जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. हिलाल माळी यांना धुळे ग्रामीणमध्ये उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
विधानसभा निवडणूकांत झालेल्या मानहानीकारक पराभवाने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे एकामागून एक नेते पक्षाला सोडचिट्टी देत आहेत.
Thackeray fraction is in big trouble in Dhule
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली