विशेष प्रतिनिधी
नाशिक : Agriculture Minister Kokate कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरुन शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर विराेधकांकडून जोरदार टीका हाेत आहे. यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त केली आहे. मी शेतकऱ्यांबाबत असे वक्तव्य केलं नाही. एका मित्राची मस्करी करत हाेताे, असे कोकाटे यांनी म्हटलं आहे.Agriculture Minister Kokate
शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नाही असं मी म्हणालोच नाही . शेतकऱ्यांना कायमस्वरुपी सक्षम करणं ही काळाची गरज आहे असं मी म्हणालो होतो. शेतकरी समृद्ध कसा होईल, त्याचा भांडवली खर्च कसा कमी होईल, उत्पादनाचे मार्केटिंग कसे करता येईल यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे कोकाटे म्हणाले.
माणिकराव कोकाटे म्हणाले, कर्जमाफी होणार नाही असेमी कुठेही म्हणालो नाही. मी ज्या शेतकऱ्याशी बोलत होतो, तो माझा मित्र आहे. त्याच्याशी थट्टा मस्करीत मी बोलत होतो . त्या माझ्या वक्तव्याचा सगळ्या शेतकऱ्यांशी संबंध नाही . व्यक्तिगत मित्राशी मी बोललो आहे. त्याची मस्करी करत होतो. कर्जमाफी हा विषय माझा नाही असे मी म्हणालाे.
माझे एक शेतकरी मित्र तिथे होते. यावेळी व्यक्तिगत माझे त्यांच्याशी संभाषण सुरु होते. जिथं जिथं शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तिथे पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. मदत मिळणार नाही असे मी म्हणालो नाही. पण मदतीच्या पलिकडे जाऊन शेतकरी कर्जबाजारी होऊ नये यासाठी सरकार योजना आणणार आहे. शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना कर्ज काढण्याची वेळच येऊ नये ही सरकारची भावना आहे असे कोकाटे म्हणाले.
दरम्यान, माणिकराव काेकाटे म्हणाले हाेते की, जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावं. कर्ज घ्यायचं आणि पाच ते दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचं नाही असे म्हणाले. तसेच कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाचीतरी गुंतवणूक आहे का? असा सवाल त्यांनी केला होता. सरकार तुम्हाला शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत. सिंचनासाठी पैसे आहेत. तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा.
That’s a friend’s joke, Agriculture Minister Kokate’s apology on farmer loan waiver statement
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis महसूल विषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- Raj Thackeray : मराठीचा आग्रह धरा, पण आंदोलन थांबवा, राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश
- Hasan Mushrif : पुण्यासारख्या घटना टाळण्यासाठी ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ लागू करा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
- Sanjay Raut संजय राऊत यांनी सोडली टीकेची पातळी, मोदी शहांचा मियाँ म्हणून उल्लेख