विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Prashant Koratkar महापुरुषांविरोधात बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला पोलिसांचा पाठिंबा नव्हता. कठोर कारवाईच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच त्याला अटक करण्यात आली आहे, असे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.Prashant Koratkar
कोल्हापूर पोलिसांनी महापुरुषांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या प्रकरणी फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातील मंचेरियल येथे अटक केली आहे. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. ते कोरटकरला पाठीशी घालण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता. “आम्हीच हायकोर्टात जामीन फेटाळला जावा यासाठी प्रयत्न केले होते. महापुरुषांविरोधात बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, त्यानुसार कोरटकरला शोधून काढण्यात आले.
कोरटकरने फरारी दरम्यान महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि तेलंगणातील मंचेरियल येथे वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अनेक टोल नाके, हॉटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, कोरटकरला कुणाकडून मदत मिळाली का, याचा शोध घेतला जात आहे. “एक महिन्यात त्याला कुणी मदत केली? कोणी त्याला आश्रय दिला? याबाबत चौकशी केली जाईल,” असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
प्रशांत कोरटकरला तेलंगणाहून कोल्हापूरकडे रवाना करण्यात आले असून, २५ मार्च रोजी सकाळी ८ ते ९ दरम्यान कोल्हापूरात आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल. अटकेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.
प्रशांत कोरटकर कोलकातामार्गे दुबईला पळून गेला असून, पळून जाण्यासाठी नागपूर पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच त्याला मदत केल्याचा आरोप केला जात होता. पण त्याच्या अटकेमुळे ही केवळ वावडीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
The Chief Minister had ordered strict action, information from Kolhapur Superintendent of Police after the arrest of Prashant Koratkar
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप