Udayanraje स्त्री शिक्षणाची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली, उदयनराजे यांच्या वक्तव्यामुळे वाद

Udayanraje स्त्री शिक्षणाची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली, उदयनराजे यांच्या वक्तव्यामुळे वाद

Udayanraje

विशेष प्रतिनिधी

पुणे : सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली. एका दृष्टीकोनातून आपण पाहीलं तर थोरले प्रतापसिंह महाराज जे होते, त्यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केले असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद सुरु झाला आहे.

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. भिडेवाड्यात ही सुरु करण्यात आली होती. याठिकाणी स्मारकाचे कामही सुरु झाले आहे. मात्र त्यालाच उदयनराजे यांनी छेद जात असल्याचे म्हटले जात आहे. उदयनराजे म्हणाले, स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली, ती देखील स्वत:च्या राजवाड्यात सुरु केली. त्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी देशाचं संविधान लिहीलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण त्याच राजवाड्यात झाले.



अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या प्रगतीबाबत चिंता व्यक्त करताना उदयनराजे भोसले म्हणाले, कदाचित तांत्रिक किंवा पर्यावरण विषयक अडचणी असतील, पण जर त्या ठिकाणी अडचण असेल, तर अरबी समुद्रालगत अठ्ठेचाळीस एकर जागा उपलब्ध आहे. एवढ्या मोठ्या जागेत स्मारक उभारता येईल. मी यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांच्याशी आणि इतर संबंधितांशी चर्चा केली असून, त्यांनी यावर स्पष्ट घोषणा करावी अशी अपेक्षा आहे.

The first school for women’s education was started by the great Pratap Singh Maharaj, controversy arose due to Udayanraje

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023