विशेष प्रतिनिधी
धुळे ,: Ladaki Baheen Yojana राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नकाने गावातील एका महिलेचा आणि तिच्या कुटुंबाचा या योजनेतून प्रामाणिकपणा समोर आला आहे. योगित खैरनार यांच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर त्यांनी आणि आणि त्यांच्या मुलाने हे पैसे शासनाला जमा केले.Ladaki Baheen Yojana
धुळे तालुक्यातील नकाणे गावातील रहिवाशी असणाऱ्या भिकुबाई प्रकाश खेरणार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आपला अर्ज केला, मात्र हा अर्ज भरल्यानंतर संबंधित अर्जासाठी आधार कार्ड जोडताना भिकुबाई यांचे आधार कार्ड ऐवजी चुकुन त्यांच्या मुलाचे आधार कार्ड जोडले गेले होते. यामुळे काही दिवसातच त्यांच्या मुलाच्या नावे असलेल्या खात्यावर तब्बल साडेसात हजार रुपये जमा झाले होते. मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर भिकुबाई यांच्या मुलाने हे पैसे आपल्या खात्यावर कसे आले याबाबत पडताळणी केली. आपले आधार कार्ड त्याला जोडले गेल्याचा प्रकार त्याच्या लक्षात आला.
याबाबत खैरनार कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हे पैसे परत करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील याची तात्काळ दखल घेत त्यांच्याकडून कागदपत्रांची पूर्तता करून एका चलनाद्वारे खैरनार कुटुंबाला आलेले पैसे शासनाला जमा केले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आपला अर्ज भरला जात असताना मुलाचे आधार कार्ड दिले गेल्यानंतर त्याच्या खात्यावर पैसे जमा झाले. मात्र हे पैसे आपल्याला नको असे त्यांनी मला सांगितल्यानंतर आपण देखील हे पैसे परत करण्याबाबत सांगितले. त्यानंतर माझे आधार कार्ड जोडून लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरल्यानंतर आता माझ्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे असे भिकुबाई खैरनार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी लाखो महिलांनी अर्ज केल्यानंतर आता त्याची शासनाकडून नियमावली देखील जाहीर करण्यात आली, मात्र अर्ज भरताना झालेल्या चुकीमुळे शासनाचे पैसे परत करण्याचा प्रामाणिकपणा भिकुबाई खैरनार यांनी दाखवला. भिकुबाई खैरनार या अपात्र झाल्याने त्यांचे पैसे काढून घेण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाले होते.
The money of Ladaki Baheen Yojana was returned to the government with sincerity
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली