विशेष प्रतिनिधी
मनमाड: Ajit Pawar’s MLA राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांवर आरोपांचे सत्र सुरूच आहे. कळवणचे आमदार नितीन पवार यांच्या त्रासाला कंटाळून ग्रामसेवकाच्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.Ajit Pawar’s MLA
कळवणमध्ये एका ग्रामसेवकाच्या पत्नीने विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. आमदार नितीन पवार आपल्या पतीला वारंवार त्रास देत असल्याचा आरोप या महिलेने केला. आपल्या ग्रामसेवक पतीला विविध तक्रारी करून आणि अधिवेशनात पतीविरोधात लक्षवेधी मांडण्याचा प्रस्ताव टाकून आमदार नितीन पवार त्रास देत असल्याचं महिलेचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणुकीत आपण विरोधात काम केल्याचा राग काढत असल्याचं महिलेने तक्रारीत म्हटल तर महिलेने केलेल्या आरोपात कुठलंही तथ्य नसल्याचं म्हणत आमदार पवारांनी आरोप फेटाळून लावले आहेत.
कळवणमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाच्या पत्नीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार नितीन पवार हे माझ्या पतीला त्रास देत आहे. त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा आरोप करण्यात आला. अभोणा पोलिसात तक्रारी अर्ज देण्यात आला आहे.
कळवण येथील शीतल महाजन यांचे पती रामराव महाजन हे ग्रामसवेक असून कळवणचे आमदार नितीन पवार आणि जयश्री पवार हे त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने खोट्या तक्रारी करून वरिष्ठ अधिकाऱ्याना चौकशीसाठी पाठवत असतात. यामुळे त्यांची पत्नी शीतल महाजन यांना मानसिक त्रास होत असल्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलले विषारी औषधं घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Tired of being harassed by Ajit Pawar’s MLA, Gramsevsks wife attempts suicide
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले
- Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!