विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दररोज सकाळी पत्रकार परिषद घेतात. त्यानंतर राज्यभरातील टीव्ही चॅनलचे पत्रकार भेटेल त्या नेत्याला त्यांच्यावर प्रश्न विचारतात. यामुळे उद्योग मंत्री उदय सामंत चांगलेच वैतागले. आता मी देखील संजय राऊतांसारखं असंबंध बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचे झाले असे की आज उदय सामंत यांना पत्रकारांनी संजय राऊत यांच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यामुळे ते वैतागले. पत्रकारांना म्हणाले, संजय राऊत यांना आपण देखील प्रश्न विचारला पाहिजे. असं किती दिवस चालणार आहे. त्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर आमच्याकडून उत्तर मागू नका त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर आम्ही त्याला उत्तर देणं असं बंधन आमच्यावरती पत्रकारांनी घालू नये. अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्यासारखा असंबंध बोलण्याचा प्रयोग मी देखील करणार आहे
छत्रपती संभाजी स्मारक संदर्भात कुठेही गैरसमज नाही. जमीन मालकांनी स्मारकासाठी जागा देण्यास मंजुरी दिली आहे. येत्या महिन्याभरात छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा आढावा तयार होईल. 90 दिवसांमध्ये आम्ही निविदा प्रक्रियेपर्यंत पोहोचू , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विकास कामाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यावर उदय सामंत म्हणाले, गेली अडीच वर्ष महायुतीच्या काळामध्ये मुंबईतील विकास कामे झाली.750 किलोमीटरचे दोन टप्प्यात काँक्रिटीकरांचे रस्ते मुंबईमध्ये होत आहेत उगाचच टीका टिपणी सुरू आहे.
एकनाथ शिंदे यांच्या खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा काही लोकांचा उद्योग असून यातून काही निष्पन्न होणार नाही . मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर आल्यात म्हणून आता हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिशा सालियान हे प्रकरण न्यायप्रविष्ठ, यात मला कॅबिनेट मंत्री म्हणून पडायचं नाही .योग्य तो निर्णय न्यायालय घेईल आणि त्याचे निर्देश पोलिसांना न्यायालय देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Uday Samant, annoyed with journalists, said that I will also speak irrelevant things like Sanjay Raut.
महत्वाच्या बातम्या
- नागपूर हिंसाचाराचे प्लॅनिंग सोशल मीडियावरून, यूट्यूबरसह एमडीपीचा कार्यकारी अध्यक्ष अटकेत
- Mahavitaran महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार
- Ajit Pawar जयंत पाटलांसोबत झाली एआयवर चर्चा, अजित पवारांनी केले स्पष्ट
- Devendra Fadnavis : दुबईला किंवा कुठेही गेला तरी पोलीस कोरटकरला शोधून काढतील, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट