विशेष प्रतिनिधी
जालना : Raosaheb Danve उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहणार नाही, असे भाकित माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. मात्र, याचवेळी रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि ठाकरे गटावर जोरदार टीका केली. Raosaheb Danve
भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त जालना जिल्ह्यात ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनात दानवे बाेलत हाेते. ते म्हणाले, एक काळ असा होता की जिल्ह्यात शिवसेनेचे ३ आमदार आणि भारतीय जनता पार्टीकडून मी एकटाच आमदार होतो. मात्र, आज काळ असा आहे की भारतीय जनता पक्षाचे ३ आमदार आणि शिवसेनेचे २ आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचं कोणी आहे का? म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मोठी ताकद होती. पण त्यांच्या वागण्यामुळे आणि व्यवहारामुळे लोक त्यांच्या विचारापासून दूर गेले. त्यामुळे काँग्रेस जवळपास संपुष्टात आली, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) संपली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहत नाही.
दरम्यान, विकास, समृद्धी, लोकहीत हे त्यांचे काम नाही. शिव्या घालणे आणि चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरे यांचे काम आहे. म्हणून पक्ष संपत चालला आहे. पुढील निवडणुकीत हा पक्ष राहत नाही. विधायक , सामाजिक , विकासात्मक अशी त्यांची विचारसरणी नाही. मी ३९ वर्ष त्यांच्यासोबत काम केले आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा पक्ष होता, साहेब गेले शिवसेना संपली, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी केली होती.
Uddhav Thackeray’s Shiv Sena will not survive till the next election, Raosaheb Danve claims
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis महसूल विषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- Raj Thackeray : मराठीचा आग्रह धरा, पण आंदोलन थांबवा, राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश
- Hasan Mushrif : पुण्यासारख्या घटना टाळण्यासाठी ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ लागू करा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
- Sanjay Raut संजय राऊत यांनी सोडली टीकेची पातळी, मोदी शहांचा मियाँ म्हणून उल्लेख