विशेष प्रतिनिधी
मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकासंदर्भात श्रेयवाद झाला नाही पाहिजे. खासकरून ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले, त्यांनी याबद्दल काहीच बोलू नये, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाला टोला लगावला. Uddhav Thackeray
बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, स्मारकाचं उद्घाटन करताना जे सरकार असेल त्यांना श्रेय जाईल. मी सरकार बदलणार वगैरे काहीही म्हटलं नाही. श्रेयवादाची लढाई व्हायलाच नको. यात काय श्रेयाची लढाई लढायची? ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले आहेत असे कुणीही या स्मारकाचं श्रेय घेऊ नये.. श्रेयवादाच्या लढाईत मला पडायचं नाही. बाळासाहेबांनी अनेकांना अनेक गोष्टी दिलं. ज्यांना बाळासाहेब काही देऊ शकले नाहीत त्यांनी स्मारकातून तरी काहीतरी घ्यावं. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं उद्घाटन कुणाच्या हातून होईल? हा मुद्दा लांबचा आहे.
फक्त पुतळा उभारणे म्हणजे स्मारक नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला काय दिले? तेच हे स्मारक देऊ शकेल, असा आमचा प्रयत्न असणार आहे. लवकरच इथे काय काय असणार? याबाबत आम्ही नंतर तुम्हाला सविस्तर सांगू . चार भिंती म्हणजे स्मारक नाही. शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट म्हणजे हे स्मारक आहे. त्यापासून सर्वांना प्रेरणा मिळावी, हीच आमची अपेक्षा आहे. शिवसेना प्रमुखांनी आयुष्यभर महाराष्ट्राला दिले तेच काम या स्मारकाने दिले पाहिजे. शिवसेना प्रमुखांनी आत्मचरित्र कधी लिहिले नाही. त्यावर त्यांना विचारले जात होते. ते म्हणत होते, मी कपाटातील माणूस नाही. मी मैदानावरचा माणूस आहे. त्यांचे आयुष्य उघडे पुस्तक होते.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचं कामही सुरु झालं आहे आर्टिटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट यांचे धन्यवाद देतो. कारण हे काम आत्ता छान वाटतं आहे पण ते करणं जिकिरीचं होतं. एक महत्त्वाचा योगायोग म्हणजे या स्मारकाच्या शेजारीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचंही स्मारक आहे. महापौर बंगला या वास्तूशी आम्ही भावनिकरित्या जोडलो गेलो आहोत, असे ठाकरे यांनी सांगितले.
२३ जानेवारी २०२६ पासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरु होतं आहे. त्याच्या आत आम्ही हे स्मारक त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्यांच्या चरणी ठेवू. मी या वेळीही जनतेला आवाहन करतो आहे की आराखडा तयार झाला आहे. शिवसेनाप्रमुखांनी आपल्या हयातीत महाराष्ट्र पिंजून काढला. आपल्याकडे जुने फोटो, भाषणं, काही जुन्या बातम्या, लेख असतील त्याचे फोटो, बातम्या हे कृपा करुन आमच्याकडे आणून दिले तर पुढच्या पिढीसाठी ते मार्गदर्शन करणारं साहित्य ठरेल असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
राष्ट्रीय स्तरावरचं हे स्मारक आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील का? असं विचारलं असता उद्धव ठाकरेंनी त्यावेळी जे पंतप्रधान असतील ते येऊ शकतील असे ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray’s target on Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut काही लोक मुख्यमंत्रीपदाचा कोट शिवून बसले होते, संजय राऊत यांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल
- Suresh Khade मिनी पाकिस्तानमधून चार वेळा निवडून आलोय, हिंदू गर्जना सभेत आमदार सुरेश खाडे यांचे वादग्रस्त वक्तव्य
- Hasan Mushrif शेतकरी कर्जमाफी आर्थिक परिस्थिती पाहून, हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण
- Ajit Pawar शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत अर्थमंत्री अजित पवार चक्क नाही होऊन पडले?