विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर झाला असून यंदा देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमधून शक्ती दुबे यांनी अव्वल क्रमांक पटकावत देशात पहिल्या क्रमांकाचे यश मिळवले आहे. दुसऱ्या क्रमांकावर हर्षिता गोयल, तर तिसऱ्या क्रमांकावर पुण्याचा अर्चित डोंगरे असून त्याने महाराष्ट्रातून सर्वोच्च यश मिळवले आहे.
UPSC च्या नागरी सेवा परीक्षा देशातील सर्वात कठीण आणि मानाच्या स्पर्धा परीक्षांपैकी एक आहे. प्रत्येक वर्षी ही परीक्षा IAS, IPS, IFS, IRS यांसारख्या गट अ व ब सेवांसाठी घेण्यात येते आणि देशभरातून लाखो तरुण-तरुणी त्यात सहभागी होतात. 2024 सालीही जवळपास ११ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता, त्यातील सुमारे ५.५ लाख विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा दिली. मुख्य परीक्षेसाठी १४ हजार ६२३ उमेदवार पात्र ठरले, तर अंतिम मुलाखतीसाठी २,९८५ जणांची निवड झाली होती. अंतिम यादीतून १,०१६ उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
पुण्याचा अर्चित डोंगरे हा नवीनचिंतन इंटरनॅशनल स्कूल आणि नंतर फर्ग्युसन महाविद्यालयामधून शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे. इंजिनिअरिंगनंतर नागरी सेवा क्षेत्रात योगदान देण्याच्या इच्छेने त्याने UPSC साठी तयारी सुरू केली. त्याच्या म्हणण्यानुसार, नियमित वेळापत्रक, मागील वर्षांचे पेपर्स, सखोल वाचन आणि टेस्ट सीरिजेसमुळे यामुळे त्याला हे यश मिळाले. अर्चितने यशाचे श्रेय आपल्या पालकांना, मार्गदर्शकांना आणि पुण्यातील स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासवर्गांना दिले.
या वर्षी महिलांनीसुद्धा उत्तम यश मिळवले आहे. हर्षिता गोयल ही दिल्लीच्या रहिवासी असून तिने दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली आहे. तिने दुसरा क्रमांक मिळवून महिला उमेदवारांच्या यशात भर घातली आहे. टॉप २५ मध्ये एकूण १० महिला उमेदवारांचा समावेश आहे, ज्यात कोमल पुनिया, आयुषी बन्सल, आणि प्रियंका शर्मा यांचाही समावेश आहे.
UPSC चा निकाल आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर (www.upsc.gov.in) उपलब्ध असून, निकाल PDF स्वरूपात पाहता आणि डाउनलोड करता येतो. यात उमेदवारांचे नावे, रोल नंबर आणि अनुक्रमांक दिलेले आहेत. यशस्वी उमेदवारांना त्यांच्या गुण, सेवा प्राधान्य आणि आरक्षणाच्या आधारे सेवा वाटप करण्यात येणार आहे. येत्या काही आठवड्यांतच निवड झालेल्या उमेदवारांना मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीत (LBSNAA) प्रशिक्षणासाठी बोलावण्यात येईल.
UPSC 2024 results declared, Shakti Dubey tops the country, Pune’s Archit Dongre third; Maharashtra’s performance shines
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत