विशेष प्रतिनिधी
पुणे : Valmik Karad मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराडने आज पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या ( सीआयडी) कार्यालयात स्वतः येऊन शरणागती पत्करली. आपण शरण येणार असल्याचे त्याने जाहीर केले होते.Valmik Karad
यादरम्यान वाल्मीक कराडने जारी केलेला एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये त्याने म्हटले आहे की केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी, फाशी द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्याच्याशी जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी दिसलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळीच एक पोस्ट केली होती.त्यात म्हटले होते की आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून समजले आहे. ही माहिती मी का देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर , एक पत्रकार परिषद घेण्यात येईल. या पत्रकार परिषदेत, त्याला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून गोवा किंवा असे कुठे तरी लांब जात असल्याची माहिती पोलिसांना खबरींकडून मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या गाडीसमोर आडवी गाडी टाकून त्याला अडविला आणि त्याच्या काॅलरला धरून त्याला खेचत आणून गाडीत बसवला, अशा सगळ्या कहाण्या प्रसृत करण्यात येतील. पण, महाराष्ट्राने अशा कुठल्याही कहाण्यांवर विश्वास ठेवू नये.
वाल्मीक कराड याला पकडायचा असता तर त्याला कधीच पकडला असता. तो शानमध्ये, कडक कपडे घालून पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्या तरी पोलीस ठाण्यात येईल आणि स्वतःहून स्वाधीन होईल. पण, त्याला रंग मात्र शौर्याचा देऊन त्याला कसा फरफटत आणला, अशा बातम्या लावायला सुरूवात केली जाईल. मला या सरकारला एवढेच सांगायचे आहे, जो बूंद से गयी हो हौद से नही आती.
अजूनही त्याला 302 चा आरोपी का करत नाही? त्याला मोक्का कधी लावणार याचे उत्तर मिळालेले नाही. न्यायालयीन चौकशीसाठी कोण न्यायाधीश चौकशी करणार याचे उत्तर मिळालेले नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.
सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे आहे. सीआयडी आणि पुणे पोलिसांची पथक वाल्मिक कराडच्या मागावर आहेत. बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्याच्या अटकेची मागणी लावून धरली आहे. वाल्मिक कराडवर खंडणीखोरीचे सुद्धा आरोप झाले आहेत.
Valmik Karad surrendered to CID, announced by releasing video
महत्वाच्या बातम्या
- South Korea दक्षिण कोरियात 181 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात, 28 ठार; लँडिंग गिअर बिघडले, धावपट्टीवर स्फोट
- Goa : गोवा बनावटीची 31 लाख रुपयांची दारू जप्त
- उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू
- Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट