विशेष प्रतिनिधी
कर्जत : कर्जत येथे आयोजित ६६व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अंतिम सामना सोलापूरचा वेताळ शेळके आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यात रंगला. शेळके याने आक्रमक खेळ करीत पाटील याच्यावर ७ गुणांनी मात करत केसरी किताब आणि मानाची गदा पटकावली.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि आमदार रोहित पवार मित्रमंडळ कर्जत-जामखेडच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. येथील संत सद्गुरू गोदड महाराज क्रीडानगरीत रविवारी सायंकाळी केसरीची अंतिम लढत पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या कुस्तीत पाटील याला अवघा एक गुण मिळविता आला. तो उपमहाराष्ट्र केसरी ठरला. कुस्ती जिंकल्यानंतर वेताळ शेळके याच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला.
फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्यातर्फे आयोजित ६७व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीत पंचाच्या निकालावर आक्षेप घेत, शिवराज राक्षे याने पंचांना लाथ मारली होती.कर्जत येथे आयोजित स्पर्धेत शिवराज सहभागी झाला होता. त्यामुळे त्याच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष्य लागून होते.
दरम्यान, अंतिम लढतीच्या आधी उपांत्य फेरीत गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे आणि मुंबईच्या पृथ्वीराज पाटील यांच्यात कुस्ती रंगली. या कुस्तीत पृथ्वीराज याने शिवराजवर मात केली. यावेळी शिवराज याने तांत्रिक बाबी तपासण्याची मागणी केली होती. मात्र, मॅटवरील पंचाचा निकाल कायम ठेवण्यात आला.
मोहोळ, मोहिते कुटुंबीयांकडून गदामहाराष्ट्र केसरी विजेता वेताळ शेळके याला दिवंगत मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ अशोक मोहोळ यांनी मानाची गदा दिली, तर उपमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यास मोहिते कुटुंबीयांच्या वतीने धवलसिंह मोहिते यांनी गदा दिली.
Vetal Shelke of Sollapur became Maharashtra Kesari
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला