नागपूर दंगलीचे व्हिडिओ बांगला देशातील आयपी आड्रेसवरून व्हायरल , फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा

नागपूर दंगलीचे व्हिडिओ बांगला देशातील आयपी आड्रेसवरून व्हायरल , फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा

विशेष प्रतिनिधी

नागपूर : नागपूर दंगलीचे मालेगाव, बांगला देश कनेक्शन समोर आले आहे. लोकांची माथी भडकावून दंगल पेटविण्यासाठी बांगला देशातील आयपी आड्रेसवरून व्हिडीओ व्हायरल करण्यात आले. सायबर पोलिसांना तपासात हिंसाचार भडकवणारे तब्बल 172 व्हिडिओ सापडले आहेत. या प्रकरणातील मास्टरमाइंड फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन हा संघर्ष उफाळून नागपूरमध्ये सोमवारी रात्री हिंसाचार झाला होता. नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री मोठा हिंसाचार झाला. दोन गटांमध्ये झालेल्या या संघर्षात तुफान दगडफेक झाली. वाहने फोडण्यात आली. वाहनांना आगी लावण्यात आल्या. जाळपोळ झाली.

अनियंत्रित जमावाला आवरताना पोलीस, अग्निशमन दलाचे जवानही या हिंसाचारात जखमी झाले. या हिंसाचारामुळे नागपूरच्या अनेक भागात अजूनही संचारबंदी कायम आहे. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष असलेला फहीम खान या सगळ्या हिंसाचारामागचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप देशविघातक कृत्य केल्याप्रकरणी फहीम खानसह 50 आरोपींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. . बांग्लादेशातील दहशतवादी संघटनेचा या नागपूर राडा प्रकरणात सहभाग असल्याच समोर आलय.



फहीम खान पाच महिन्यांपूर्वी मालेगावात येऊन गेल्याच समोर आलय. फहीम खान मालेगावात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विधानसभा निवडणूक वेळी त्याने त्याच्या मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावात पक्षाची बांधणी केली होती.एमडीपी पार्टी काढून मालेगाव मध्य मधून मोहम्मद फरान शकील अहमद यांनी निवडणूक लढवली होती.

फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष आहे. दहावीपर्यंत शिक्षण झालेला फहीम खान 38 वर्षांचा आहे. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष असलेल्या फहीम खान याने लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्याला 1 हजार 73 मतं मिळाली होती. फहीम खानने नागपुरात जमाव जमवल्याचा आरोप केला जात आहे.

Video of Nagpur riots goes viral on IP address in Bangladesh, Faheem Khan charged with sedition

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023