Vinayak Raut राऊतांनी कोकणातून उद्धवसेना संपविली, शिंदे गटाच्या नेत्याचा आरोप

Vinayak Raut राऊतांनी कोकणातून उद्धवसेना संपविली, शिंदे गटाच्या नेत्याचा आरोप

राऊतांनी कोकणातून उद्धवसेना संपविली, शिंदे गटाच्या नेत्याचा आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे गटातून शेवटचा माणूस बाहेर पडेपर्यंत त्याला गद्दार हा शिक्का लावला जाईल. विनायक राऊतांनी कोकणातही उद्धवसेना संपवली, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक संजय घाडी यांनी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाला हादरे बसत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आलेल्या संजना घाडी आणि माजी नगरसेवक संजय घाडी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. संजना घाडी यांना पक्षाच्या वतीने शिवसेना शिंदे गटातील उपनेत्या आणि पक्ष प्रवक्त्या अशी दुहेरी जबाबदारी देण्यात आली. यानंतर माजी नगरसेवक संजय घाडी यांनी विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.

घाडी म्हणाले, उद्धव ठाकरे यांना दाऊदकडून नाही तर विनायक राऊत यांच्यापासून खरा धोका आहे. ते स्वतःतर लोकसभेला पडलेच. पण त्यांनी कोकणातही शिवसेना संपवली. उद्धव ठाकरे हे उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.

विनायक राऊत यांचा मातोश्रीवर हस्तक्षेप वाढला असून, लोक म्हणतात, त्याप्रमाणे आता त्यांनी बिछाना घेऊन मातोश्रीवर येणे बाकी आहे. राऊत यांचा पक्षसंघटनेतही हस्तक्षेप वाढला असून त्यामुळे संघटनेचे नुकसान होत आहे असा आरोप संजना घाडी यांनी केला. आमच्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्यांना कोणतीही जबाबदारी दिली जात नाहीमातोश्रीवर गद्दार हा शिक्का तयार करून ठेवलेला आहे.

पक्षातून शेवटचा माणूस बाहेर पडेपर्यंत त्याला गद्दार हा शिक्का लावला जाईल. उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला पक्षांतर्गत गद्दार बसले आहेत, त्यांचा वेळीच बंदोबस्त केला तर कदाचित ती संघटना वाचू शकेल. ठाकरे यांचा पक्ष सध्या शिवसेना नेते विनायक राऊत चालवत आहेत. विनायक राऊत हेच सध्या पक्षातील नियुक्ती करतात, तेच तिकीट वाटप करतात. राऊत हे कशा पद्धतीने पक्ष चालवतात ते बऱ्याच जणांना माहिती आहे. ठाकरे यांचा पक्ष हा हिंदूत्वापासून खूप दूर गेला असल्याचीही टीका त्यांनी केली आहे.

आमच्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्यांना कोणतीही जबाबदारी दिली जात नाही. आपल्या प्रभागात स्पोर्टस क्लब करायचा आहे, प्रसुतीगृह अद्ययावत करायचे आहे. अशा विकासकामांसाठी आपण हा निर्णय घेतल्याचे घाडी यांनी सांगितले.

Vinayak Raut ended Uddhav Sena from Konkan, alleges Shinde faction leader

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023