विशेष प्रतिनिधी
कुडाळ : Eknath Shinde कोकणात विधानसभेच्या १५पैकी १४ जागा महायुतीला आपण मिळवून दिल्या . शिंदेसेनेच्या आठ उमेदवारांनी भगवा फडकवला. हिंदुत्त्वाच्या मुळावर उठलेल्या उद्धवसेनेची मशाल मतदारांनी कायमची विझवून टाकली, असा हल्लाबाेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर केला आहे.Eknath Shinde
कुडाळ येथील एसटी आगाराच्या मैदानावर झालेल्या आभार यात्रेत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणच्या मतदारांनी शिंदेसेना आणि महायुतीवर आपला विश्वास दाखवून दिला आहे. कोकणवासीयांच्या या अपार प्रेमासमोर मी नतमस्तक व्हायला आलो आहे. त्याबद्दल तुमचे आभार मानण्यासाठी मी आलो आहे. असेच प्रेम कायम ठेवा,
काश्मीरमध्ये पर्यटकांच्या मदतीला गेल्याबद्दल हाेत असलेल्या टीकेला उत्तर देताना शिंदे म्हणाले, मी काश्मीरमध्ये लोकांच्या मदतीसाठी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर त्या लोकांना आपला माणूस आल्यासारखे वाटले. त्यांना धीर आला. विरोधक टीका करतात. पण, संकटसमयी त्या ठिकाणी जायचे नाही तर मग कधी जायचे. तिकडे लोकांना भेटल्यानंतर त्यांनी अनेक भावना व्यक्त केल्या. त्यांना विश्वास आला की, आता आम्ही सुरक्षितपणे आमच्या घरी जाऊ शकतो आणि तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप माघारी आणू शकलो.
पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हा खरे म्हणजे हा कुठल्या व्यक्तीवर नाही, तर देशावर झालेला हल्ला आहे आणि याला जशास तसे उत्तर दिले पाहिजे. अशी प्रत्येक भारतीय नागरिकाची भावना आहे. हा नवा भारत आहे. घुसके मारेंगे असे सांगून आर पार घुसवणारा भारत आहे. त्यामुळे या ठिकाणी जशास तसे उत्तर त्यांना पाकिस्तान धार्जिण्या दहशतवाद्यांना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
शिंदे म्हणाले, कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. कोकणात आल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात आल्यासारखे वाटते. तसा अनुभव या ठिकाणी येतो आणि म्हणून हा भगवा इथे डौलाने फडकतो आहे. या भगव्यासाठी जान कुरबान करणारे कोकणातले शिवसैनिक हे भगव्याचे वारसदार आहेत. आपले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे यांच्या खांद्यावर शिवसेनेचा भगवा आहे. नीलेश राणे हे फणसासारखे आहेत. बाहेरून कठोर दिसत असले तरी आतून प्रेमळ आणि गोड आहेत. शिवसेनेचा भगवा घेतल्यापासून फक्त कामावर आणि विकासावर त्यांनी लक्ष दिलेला आहे. स्वाभिमानाने पेटून उठलेला आणि अडचणीला धावून जाणारा तो खरा शिवसैनिक आहे.
Voters extinguished the Mashal raised at the roots of Hindutva forever, Eknath Shinde’s attack
महत्वाच्या बातम्या
- पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधानांवर आरोप करणाऱ्या एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना अटक
- Muslim Organizations : पाकिस्तानला धडा शिकवा, मुस्लिम संघटनांची मागणी
- PSL Broadcast Stopped : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताचा मोठा झटका; पीएसएलचे भारतात प्रसारण थांबवले
- Michael Rubin : काश्मीर पाकिस्तानच्या गळ्याची नस असेल, तर भारताने आता त्याचा गळाच कापावा, अमेरिकन थिंक टँक सदस्य मायकेल रुबिन यांचा टोला