विशेष प्रतिनिधी
सांगली : Sambhaji Bhide माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटविण्याची मागणी केली आहे. वाघ्या कुत्र्याची कथा ही कपालकल्पीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावरून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. रायगडवरच्या वाघ्या कुत्र्याची कथा ही सत्य आहे, संभाजीराजे भोसले जे बोललेत ते चुकीचं आहे असा दावा संभाजी भिडेंनी केला.Sambhaji Bhide
वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद तापला असून त्यावर संभाजीराजे छत्रपतींनी आक्षेप घेतला आहे. या कुत्र्याच्या समाधीला कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही, संदर्भ नाही असा दावा त्यांनी केला. हा पुतळा 31 मे पर्यंत राज्य सरकारने काढावा अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. संभाजीराजेंच्या या भूमिकेवर बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, “संभाजीराजे भोसले जे बोलतात ते चूक आहे. वाघ्या कुत्र्याची कथा सत्य आहे. वाघ्याने शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतली होती. त्या काळी माणसे एकनिष्ठ नव्हती तेवढी एकनिष्ठ कुत्री होती हे दाखवण्यासाठी हा पुतळा आवश्यत आहे.”
कुणाल कामरा प्रकरणावरून विधानसभेत सत्ताधाऱ्यांनी हक्कभंग प्रस्ताव आणला. सभागृहाच्या कामकाजाचा महत्त्वाचा वेळ हा या प्रकरणावर गेला. त्यावरून संभाजी भिडेंनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, “कुणाल कामरा हा जो नादानपणा सुरू आहे आणि त्यावरून विधानसभेत जो धुडगूस सुरू आहे तो काही लोकशाहीला शोभणारा नाही. मी कुठल्या व्यक्तीचं नाव घेत नाही, पण ज्यांनी ज्यांनी हा निचपणा केलाय ते सगळे देशद्रोही आहेत.
आर आर आबांची हिंमत अलौकीक होती. त्यांनी डान्स बार बंद करण्याची धमक दाखवली. आताचे कामरा नावाच्या पद्धतीची हॉटेल चालवणे म्हणजे डान्सबारची सावत्र भावंड आहेत असं संभाजी भिडे म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक कविता केल्यानंतर कॉमेडियन कुणार कामराच्या विरोधात विधीमंडळात हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला आहे. या प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावरही हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला आहे.
रविवारी (२३ मार्च) कुणाल कामराने एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओत त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार सुधा मूर्ती, व्यावसायिक मुकेश अंबानी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या सगळ्यांची खिल्ली उडवली. विडंबनात्मक गाणीही म्हटली. यावरुन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक आक्रमक झाले. दरम्यान कुणाल कामरावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले.
Waghya Dog’s Story is True, Deserves a Memorial as a Symbol of Loyalty: Sambhaji Bhide Targets Sambhaji Raje
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची