विशेष प्रतिनिधी
मुंबई : Narahari Zirwal नरहरी झिरवळ यांनी नौटंकी करू नये सर्व काही शरद पवार यांनी त्यांना दिलं होते.आता दैवत आहेत म्हणतायत. दैवताला सोडून जाताना तुम्हाला लाज नाही वाटली का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.Narahari Zirwal
विधानसभेचे माजी उपसभापती आणि अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ यांनी शरद पवार यांची माफी मागतो असे म्हटले आहे. त्यावर पलटवार करताना आव्हाड म्हणाले, शरद पवार देखील माणूस आहेत. त्यांना देखील हृदय आहे हे समजणाऱ्या माणसांनी माफी मागावी. तुम्हाला उपसभापती कोणी बनवले? कशाला वाद निर्माण करत आहात? पब्लिसिटी कशाला करतात? घरात फोटो लावायला घाबरत आहेत आणि दैवत म्हणून सांगतात. शरद पवार यांच्या दुःखाचा कधी विचार केला आहे का? आम्हाला प्रत्येकवेळी सत्ता चाटण्याची गरज वाटत नाही .
वाल्मिक कराड याला बीड पोलीस ठाणे येथे सवलती मिळत आहेत. यावर ते म्हणाले, त्याने अख्या सरकारची खाट टाकली आहे. इतक्या उघड पणे होत असेल तर यात सरकारची लाज जात आहे. त्याला वाटले असेल पोलीस स्टेशन माझे घर आहे. अशा प्रकारची सुविधा मिळवायची असेल तर आजारी माणसाला सुध्किदा ती भीक मागावी लागते. पण यांना लगेच मिळते. सामान्य माणसाला अशी सवलत देणार का ?
मोठ्या आकाला म्हणजे धनंजय मुंडे यांना वाचविण्यासाठी छोटा आका वाल्मीक कराड यांचा एन्काऊंटर होऊ शकतो असा संशय काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला होता. यावर आव्हाड म्हणाले, विजय वडेट्टीवार यांच्या बोलण्यामध्ये फॅक्ट आहे. राजाला वाचवण्यासाठी बुद्धिबळात प्यादाला मारले जाते. प्यादाचा वापर झाला की बळी दिला जातो.
धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीवर आव्हाड म्हणाले, मी पहिल्या दिवसापासून राजीनाम्याबाबत सांगत आहे. मागणी करत आहे. मोठा आका वैगरे कशाला बॉस, डीएम, दाऊद इब्राहिम कोण आहे त्याचे नाव घ्या ना.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करणार यावर ते म्हणाले, कोणाची संपत्ती जमा करणार आहेत? कोणावर मोकाका लावणार ? सगळीकडे गोंधळाची परिस्थिती निर्माण केली आहे. जज पण घाबरले आहेत ?गोंधळ घातला आहे, लोकांना संभ्रमित केले आहे
परळी येथील राख माफियांची स्टोरी गॅंग ऑफ वासेपुर सारखी असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.
एआईचा वापर करून संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय देणार असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू असे सांगून आव्हाड म्हणाले, फक्त न्याय देताना AI समोर आधुनिक कोणीतरी इंटेलिजन्स यायला नको.एक आर्टिफिशियल आणि ओरिजनल इंटेलिजन्स आहे. तुमच्याकडे खूप माणसं आहेत त्यांना पैशांचं गणित बरोबर समजते
Wasn’t you ashamed while living God like Sharad Pawar?; Jitendra Awad’s question to Narahari Zirwal
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange : तर मराठे रस्त्यावर उतरणार, मनोज जरांगे यांचा इशारा
- Uddhav Thackeray : चंद्रकांतदादांकडून उध्दव ठाकरे यांचा करेक्ट कार्यक्रम, पुण्यातील पाच नगरसेवक करणार ठाकरेंना जय महाराष्ट्र
- Ministry of Defence : संरक्षण मंत्रालयाने 2025 हे ‘सुधारणेचे वर्ष’ म्हणून केले घोषित
- Suresh Dhas : माध्यमांमध्ये बोलण्यापूर्वी सरकारशी चर्चा करा, आमदार सुरेश धस यांना बावनकुळेंची तंबी