विशेष प्रतिनिधी
Solapur News : ईव्हीएम घोटाळ्यावरून आमचा गडी केव्हा राजीनामा देतो याची मी वाट पाहत होतो, असा टाेला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राेहित पवार यांना लगावला आहे.
उत्तम जानकर यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आमदार उत्तम जानकर आणि रोहित पवार यांच्याकडून ईव्हीएमवरून आरोप करण्यात येत आहेत. या आरोपांना प्रत्युत्तर देताना उत्तम जानकर आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांना टोला लगावताना राम शिंदे म्हणाले, जिंकून आल्यानंतरही ईव्हीएममध्ये घोटाळा झाला म्हणून राजीनामा देणार असं म्हणणारे रोहित पवार हे केव्हा राजीनामा देतात याची मी वाट पाहात होतो.
उत्तम जानकर यांच्यावर देखील निशाणा साधताना शिंदे म्हणाले, उत्तम जानकर तीन वेळा हरले, त्यावेळी मशीनमध्ये घोटाळा झाला नाही. मात्र निवडून आल्यानंतर त्यांना मशीनमध्ये चूक आढळून आली. आज काल राजकारणामध्ये कोण कोणाबरोबर आहे काहीच कळत नाही.
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं, महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीचे उमेदवार 232 जागांवर विजयी झाले तर महाविकास आघाडीला मात्र अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावलं लागलं, या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय घेत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उत्तम जानकर (Uttamrao Jankar) यांनी तर त्यांच्या मतदारसंघात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने हा प्रयत्न हाणून पाडला. दिल्लीत जाऊन त्यांनी या विषयावर निवडणूक आयाेगाकडे तक्रार केली आहे.
We were waiting for when he will resign, Ram Shinde’s attack on Rohit Pawar
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला