विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावर लढू. काय होईल ते होईल. आम्हाला आजमावयाच आहेत. से संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. मुंबई, ठाणे, पुण्यापर्यंत कार्यकर्त्यांना संधी कधी मिळेल? त्यांना संधी नाही मिळाली तर त्याचा फटका पक्षाला बसतो निवडणूका लढून पक्ष मजबुत करायचा आहे, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वबळावर लढण्याची आरोळी ठोकली आहे.
काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर ते म्हणाले, ते काय बोलतात त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. हरियाणामध्ये आम्ही होतो का ? हरियाणामध्ये काँग्रेस पक्षासमोर कोणी नव्हत मग का हरलात? महाराष्ट्रात काही लोक मुख्यमंत्री पदाचा कोट शिवून मोकळे होते. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. शिवसेना महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष आहे पश्चिम बंगाल मध्ये शिवसेना, संजय राऊत होते का ? मग देशभरात का पराभव होतो
देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही संस्कार आणि संस्कृती पाळलेली आहे. आम्ही निवडणूका एकमेकांच्या विरुद्ध लढलो. एकमेकांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. पण जो लोकशाहीमध्ये इंटरेस्ट आहे, राज्याचा, जनतेचा विकास जे सरकार करतं त्याकडे विरोधी पक्षाने सकारात्मक दृष्टीने पाहावं. देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला चांगलं काम केलं, सुरुवात केली. आम्ही त्याला पाठिंबा दिला. या राज्याला एक परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, वसंतराव नाईक असतील राज्यात खुप मोठी परंपरा आहे
-व्यक्तिगत शत्रूत्व न ठेवता राजकारण केलं पाहिजे असे आवाहन करत ते म्हणाले, व्यक्तिगत शत्रुत्व ठेवून राजकारण करण्याची परंपरा भारतीय जनता पार्टीने सुरू केली. आपल्या राजकीय विरोधकांना खोटे गुन्हे खटेल दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकायचं. ईडी, सीबीआय पोलीसांचा वापर करायचा ही परंपरा महाराष्ट्रात कधीच नव्हती. ती परंपरा सध्याचे मुख्यमंत्री संपवणार असतील तर राज्याच्या राजकीय वातावरणासाठी फायदाच होईल. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, आणि कायमचा मित्र ही नसतो. आम्ही २५ वर्ष मित्र होतोच ना, देवेंद्र फडणवीस जेव्हा राजकारण नव्हते तेव्हा पासून भाजप पक्ष आणि शिवसेनेची युती होती. आम्ही भाजपचे जूने आणि विश्वासार्ह मित्रच होतो, पण आज आम्ही मित्र राहिलो नाही. राजकारणात काहीही असंभव नाही.
शरद पवार यांच्यावर बोलताना ते म्हणाले, कोण कुठे जाईल हे देवेंद्र फडणवीस ठरवू शकत नाही. प्रत्येक पक्षाची स्वत: ची भूमिका असते. त्यांनी ज्या प्रकारे आमच्या पक्षाला तोडलं आहे ती कोणत्या प्रकारची आयडोलॅाजी आहे. राजकारणात जोवर भ्रष्ट्राचार सुरु असेल तोवर आमचा संघर्ष सुरु राहिल.
अजित पवार वक्तव्य यांनी शेतकरी कर्ज माफी विरोधात भूमिका जाहीर केली आहे. यावर राऊत म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमुक्तीचा उल्लेख आहे. लाडक्या बहिणींचा 2100 मिळणार असेल आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री आहेत. तुम्ही काय बोलताय, तुमच्या भाषणात याला अर्थ नाही. जाहीरनाम्यातील तुमच प्रत्येक वचन तुम्हाला पुर्ण करावं लागेल.
We will fight on our own, what will happen will happen, Sanjay Raut cry
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली