विशेष प्रतिनिधी
नाशिक: “महाराष्ट्रात 100 दिवसांमध्ये महिलांसाठी एकतरी चांगली योजना आणली का? गेल्या 100 दिवसांमध्ये शेतकऱ्यांसाठी एकतरी चांगली योजना आणली? तसेच या 100 दिवसांमध्ये तरुण-तरुणींसाठी काय केले?” असे सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केले.
नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे शिबीर सुरू असून यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “मी संजय राऊत यांना फोन केला होता. यावेळी त्यांना विचारले की संजय काका उद्या काय बोलायचे आहे? मला विषय काय दिला आहे? तुम्हाला त्यांची स्टाईल माहिती आहे, ते पटकन काहीतरी बोलून जातात. त्यांनी मला सांगितलं महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे यावर बोल.
या सरकारला 100 दिवस उलटून गेले आहेत. पहिले 100 दिवस हनिमून पिरियड मानला जातो. या काळात मुख्यमंत्री जे काही करतात, त्याचे कौतुक साधारणपणे केले जाते. पहिल्या 100 दिवसांत एकही चांगली योजना कोणासाठीही आणली नाही, असा आरोप त्यांनी केला.
देवेंद्र फडणवीस बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत होते, आमचे सरकार येणार, सरकार आल्यानंतर हे करू वगैरे काय काय सांगत होते ते. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, सातबारा कोरा करणार इत्यादी म्हणाले होते. यावेळी शेतकऱ्यांची वीजमाफी सांगितली होती. फडणवीसांचे सरकार बसले, त्यांचे 136 आमदार निवडून आलेत. हे फडणवीसांचंच सरकार आहे. एकनाथ शिंदे तिथे चिकटण्यासाठी चिकटले आहेत. कारण बाहेर पडले तर तुरुंगात जातील. आता अमरावतीहून थेट गावी जाणार आहेत. कारण नाराजीचे नाट्य सुरू झाले आहे. आता पुढचं मी काही बोलत नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
What has the government done in 100 days? Aditya Thackeray questions
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis शेतकऱ्यांना पुढील वर्षीपर्यंत १२ तास मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- Sanjana Ghadi : शिवसेना ठाकरे गट ठराविक गटाच्या ताब्यात; संजना घाडींचा उध्दव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करताना टोला
- लाडक्या बहिणींमुळे निवडून आलो, गुलाबराव पाटील म्हणाले मला गॅरंटी नव्हती
- चंद्रकांत खैरे ढोंगी माणूस, आता त्यांनी नातवंडं सांभाळावीत, संदीपान भुमरे यांची टीका