Sushma Andhare : चौकशी दरम्यान धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला काय हरकत आहे ? सुषमा अंधारे यांचा सवाल

Sushma Andhare : चौकशी दरम्यान धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला काय हरकत आहे ? सुषमा अंधारे यांचा सवाल

Sushma Andhare

विशेष प्रतिनिधी

पुणे : Sushma Andhare मी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत नाही. त्यांनी जर काही केलं नाही तर कर नाही त्याला डर कशाला? मग चौकशी दरम्यान त्यांनी राजीनामा द्यायला काय हरकत आहे ? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.Sushma Andhare

पंकजा मुंडेंवर जेव्हा चिक्कीचे आरोप झाले तेव्हा त्यांचा राजीनामा मागण्यात धनंजय मुंडेंसारखे लोक अग्रेसर होते. आता मात्र ती परिस्थिती दिसत नाही अशी आठवण करून देत अंधारे म्हणाल्या, त्यांनी जर काही केलं नाही तर कर नाही त्याला डर कशाला? मग चौकशी दरम्यान त्यांनी राजीनामा द्यायला काय हरकत आहे? बीडमध्ये गुन्हेगाराला वेगवेगळ्या सुविधा दिल्या जात आहे. त्यामुळे बीड मधल्या जनतेच्या मनात अस्वस्थता दिसते. जर असचं चालु राहिलं तर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कधीच शिक्षा होणार नाही.अजुनही कोणी सुदर्शन घुले यांच्यावर काही बोलत नाही. फरार आरोपी अजून सापडत नाहीत.बीड मधील दहशत कशी संपेल मग?



क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या सर्व सावित्रीच्या लेकींना शुभेच्छा देत त्या म्हणाल्या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि संघटना, सांविधानिक पदांवर असणाऱ्या व्यक्तींना माझं अपील असेल कि सेलिब्रिटी आणि वलयाकिंत व्यक्तिंकडे फक्त लक्ष देवू नका. जे खरोखर पीडित आहे त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणं गरजेच आहे. कल्याण मध्ये दोन महिलांची हत्या करण्यात आली. त्यावर व्यक्त न होणाऱ्या सांविधान पदावरच्या अनेक लोकांना अगदी सेलिब्रिटी आणि वयलकिंत व्यक्तींवर व्यक्त व्हायला अक्षरश: मायेचे लोंढे येतात, हे त्रासदायक आहे.

आधी तु्म्ही गुजराती आणि त्यांना समर्थन असणाऱ्या लोकांचे समर्थन केले. आता मराठी लोकांवर अन्याय होतात असा उर बडवण्यात काय अर्थ आहे ? असा टोला त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला.

सामनाच्या आजच्या अग्रलेखात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करण्यात आले आहे. त्यावर बोलताना अंधारे म्हणाल्या ,एखाद चांगल काम केलं असेल तर कौतुक करायला काय हरकत आहे. राजकारण म्हणजे प्रत्येक वेळेला हातात भाले घेऊन उभं राहिलं पाहिजे असं नाही .ज्या मुख्यमंत्र्याचं कौतुक केलं जातय त्यांच्याकडून सगळ्यांसाठी सारख्याचं गोष्टींची अपेक्षा केली जातीय. जे युटु्ब चॅनल शिवसेना ठाकरे गटाची बदनामी करत आहेत त्याच्यावर कारवाई करणार आहे का ?

शिवसेना ठाकरे गटाचे तीन नगरसेवक भाजपच्या वाट्यावर आहेत. त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे असे सांगून अंधारे म्हणाल्या, ज्यांना संघर्ष नको हवा असतो ते सत्तेच्या वाटेवर जातात .

What is wrong with Dhananjay Munde resigning during the investigation? Question by Sushma Andhare

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023