विशेष प्रतिनिधी
मुंबई : Gunaratna Sadavarte छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी त्या काळी महात्मा फुलेंनी शोधली, टिळकांनी, होळकरांनी जे काम केलं ते इतर घराण्यांनी काम का नाही केले? असा सवाल करत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अप्रत्यक्षरित्या भोसले घराण्यावर निशाणा साधला आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना रायगड समितीच्या पदावरून दूर करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.Gunaratna Sadavarte
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरून वादाची ठिणगी पडली आहे, संभाजीराजे छत्रपतींनी काही पुराव्यांचा दाखला देत वाघ्याचे स्मारक तिथं नव्हते, असा दावा केला आहे. वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावर प्रतिक्रिया देताना भिडे गुरूजी यांनी म्हटलं की संभाजीराजे भोसले बोलतात ते 100 टक्के चूक आहे.
वाघ्या कुत्र्याबाबत आपण वाचलेली कथा सत्य आहे. वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे, आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. ते म्हणाले, संभाजी भिडे गुरुजी यांचं या विषयावर चिंतन आहे, त्यांचं मी समर्थन करतो. वाघ्या श्वान आहे, मी त्याला कुत्रा म्हणणार नाही. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुरातत्व विभागाचा निर्णय विचारात न घेता समाधी निष्कासित करण्याची मागणी केली. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.
सदावर्ते म्हणाले की, राज्यपालांना विनंती करेल की संभाजीराजे छत्रपती यांना पदावरून बाजुला करावं, त्यांनी कोणता रिसर्च पेपर काढला आहे, यावर? या मुद्द्यावर आम्ही माहिती गोळा करत असून, पंतप्रधान मोदींसमोर हा विचार ठेऊ. प्राधिकरणाने आतापर्यंत काय कार्य केले? त्यासंदर्भात चौकशीची मागणी न्यायालयात करू.
What was done for the tomb of Chhatrapati at Raigad? Gunaratna Sadavarte’s indirect attack on the Bhosle family
महत्वाच्या बातम्या
-
Sudhakar Pathare : आयपीएस सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन
-
Eknath Shinde तुम्ही अत्यंत चिल्लर लोक, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल
-
Congress : सत्तेच्या हव्यासामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, खोळंबल्या, काँग्रेसचा आरोप
-
उदयनराजे सरकारवर भडकले, छत्रपतींबाबत कायदा करायला बजेट लागते काय?