विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sandeep Deshpande महापौर बंगला हवा तेव्हा बाळासाहेब देशाचे, एरवी फक्त तुमचे वडील असे का? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना केला आहे.Sandeep Deshpande
मनसेचा गुढीपाडवा मेळावा ३० मार्च रोजी आहे. यासंदर्भातल्या टिझरसाठी राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचे फोटो घेतले. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वांना बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वावाचून पर्याय नाही, हेच दिसते आहे. जर महाराष्ट्र जिंकायचा असेल तर बाळासाहेबांचा फोटो वापरावा लागेल. या गद्दारांनीही बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरलाच होता. त्याशिवाय काही पर्यायच उरलेला नाही,
याला प्रत्यूत्तर देताना संदीप देशपांडे म्हणाले, माननीय बाळासाहेबांचा फोटो होर्डिंग वर लावणे हे पक्षाचे धोरण नाही .एखाद्या उत्साही कार्यकर्त्याची भावना असू शकते. पण श्री उद्धव ठाकरेंना माझा प्रश्न आहे महापौर बंगला घशात घालायचा होता तेव्हा बाळासाहेब देशाचे एरवी ते फक्त तुमचे वडील असं कस काय? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते की , ठाकरेंनी आपल्या सख्ख्या भावांना पद्धतशीरपणे दूर केले. बाळासाहेबांची वैचारिक संपत्ती त्यांनी सोडली. पण इतर प्रॉपर्टीसाठी भावासोबत दावा मांडला. हा दावा कोर्टात गेला. बाळासाहेबांना शेवटच्या दिवसांत त्यांनी किती त्रास दिला हे सगळ्यांना माहित आहे. राज ठाकरे त्याबाबत अनेकदा बोलले आहेत. औरंगजेबाने सत्तेसाठी आपल्या भावांचा काटा काढला. उद्धव ठाकरे यांनी वेगळे काय केले? उद्धव ठाकरे हे आधुनिक जगातले औरंगजेब आहेत,
When you wants a Mayor bungalow, Balasaheb is the country’s leader, not just your father, Sandeep Deshpande’s question
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची