विशेष प्रतिनिधी
मुंबई : Dhananjay Munde राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा वादाच्या भाेवऱ्यात सापडले आहेत. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या दोन मुलाचे आई आणि वडील कोण? असा प्रश्न न्यायाधीशांनी धनंजय मुंडे यांच्या वकिलाला विचारला. मुले तुमची मग करुणा शर्मा मुलांच्या आई कशा नाहीत? असा प्रश्नही केला आहे.Dhananjay Munde
धनंजय मुंडे यांना पहिली पत्नी करुणा मुंडे-शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश काही दिवसांपूर्वी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने दिला होता. या आदेशाला धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. याप्रकरणी माझगाव सत्र न्यायालयात सुनावणीवेळी धनंजय मुंडे यांच्या वकिलाने धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केले नसल्याचा युक्तीवाद केला.
काही दिवसांपूर्वीच वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्याविरोधातील आरोप मान्य करत करुणा शर्मा यांना पोटगी मान्य केली होती. करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाख रुपये पोटगीचा आदेश न्यायालयाने दिला होता. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या या आदेशाला मंत्री धनंजय मुंडे हे माझगाव सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. करुणा शर्मा यांना पोटगी मिळू नये, म्हणून धनंजय मुंडे यांच्या वकिलाने दोघांचे अधिकृत लग्न न झाल्याचा दावा. तर करुण शर्मा यांच्या वकिलाने लग्नाचे पुरावे असल्याचे म्हटले. याप्रकरणी 5 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
धनंजय मुंडे यांच्या वकिलाने युक्तीवाद केला की, धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केलेले नाही. यावर धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्या दोन मुलाचे आई आणि वडील कोण आहेत? असा प्रश्नच न्यायाधीशांनी धनंजय मुंडे यांच्या वकिलाला विचारला. यानंतर धनंजय मुंडे यांचे वकील म्हणाले की, धनंजय मुंडे यांनी मुलांना स्वीकारलं आहे, पण त्यांच्या आईशी लग्न केलेलं नाही. यावर न्यायाधीशांनी पुन्हा विचारले की, मुलं तुमची आहेत, असं तुम्ही म्हणता, मग करुणा शर्मा मुलांच्या आई कशा नाहीत? असा प्रश्नही विचारला.
धनंजय मुंडेंचे वकील म्हणाले की, करुणा शर्मा वर्षाला 15 लाखच्या जवळपास कमवतात. त्या इन्कमटॅक्स भरतात. त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम असूनही त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला आहे. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी दोन्ही मुलांना स्वीकारलं आहे आणि त्यांना नाव दिले आहे. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्यासोबत काही काळ घालावला आहे. पण याचा अर्थ त्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी होत नाहीत. त्या दोघांमध्ये पती-पत्नीसारखे संबंध नव्हते आणि त्यांचे अधिकृत लग्नही झाले नव्हते, असा पुनरुच्चार धनंजय मुंडे यांच्या वकिलाने केला.
धनंजय मुंडे यांच्या वकिलाने म्हटले की, धनंजय मुंडे यांचं एक लग्न झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी दुसरं लग्न केलं नाही. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे परस्पर संमतीने संबंध होते, हे कुठेही लपवलं नाही. मात्र धनंजय मुंडे यांचं करुणा शर्मा यांच्यासोबत लग्न झालेलं नाही. परंतु करुणा शर्मा आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत आणि त्यांनी निवडणूकसुद्धा लढवली होती, हा मुद्दाही धनंजय मुंडे यांच्या वकिलाने उपस्थित केला.
धनंजय मुंडे यांच्या वकिलाच्या युक्तीवादानतंर करुण शर्मा यांचे वकील म्हणाले की, करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत 1998 ला लग्न झाले आहे. या लग्नानंतर त्यांना अपत्य झाली आणि त्यांचे एकत्र फोटो आहेत, असे म्हटले. यावर न्यायाधीशांनी विचारले की, करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झाले आहे, याचे तुमच्याकडे पुरावे काय? असा प्रश्न विचारला. यावर करुण शर्मा यांचे वकील म्हणाले की, आम्ही सर्व पुरावे सादर करू. आम्हाला पुरावे सादर करण्यासाठी वेळ हवा आहे, असे म्हटले. यावर न्यायालयाने पुढील तारखेपर्यंत पुरावे सादर करा, असे म्हणत याप्रकरणी 5 एप्रिलला पुढील सुनावणी ठेवली आहे.
Who are the mother and father of Dhananjay Munde and Karuna Sharma’s two children? Court questions
महत्वाच्या बातम्या
-
Sudhakar Pathare : आयपीएस सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन
-
Eknath Shinde तुम्ही अत्यंत चिल्लर लोक, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल
-
Congress : सत्तेच्या हव्यासामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, खोळंबल्या, काँग्रेसचा आरोप
-
उदयनराजे सरकारवर भडकले, छत्रपतींबाबत कायदा करायला बजेट लागते काय?