कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार २०२४ सालीच दाखवलं, मुख्यमंत्र्यांचे कुणाल कामराला उत्तर
विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने विडंबनात्मक गाणं तयार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना गद्दार म्हटल्याने संताप व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही असे फटकारत कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार हे महाराष्ट्रातील जनतेने २०२४ सालीच दाखवलं, असे उत्तर त्याला दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्टॅण्डअप कॉमेडी करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही. कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे जनतेने २०२४ साली दाखवलं आहे. राज्यातील माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, राज्याचे वरिष्ठ नेत्याचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. तुम्ही व्यंग करा, पण अपमानित करण्याचा काम कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही.
कामरांनी माफी मागितली पाहिजे, ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत, ते जर त्यांनी वाचलं असेल तर संविधानानेच सांगितलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही, दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यांवर अतिक्रमण करता येणार नाही. कुणाल कामराने माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली.
कामरा याने त्याच्या मुंबईतीली एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाण्याची दाढी…गद्दार नजर वह आये असे विडंबनात्मक गाणं तयार करून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा विडिओ शेअर केला. त्यामुळे शिवसेनेचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेनेच्या समर्थकांनी कार्यक्रमस्थळी जाऊन तोडफोड केली. खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये हा कार्यक्रम झाला. या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.
Who is a traitor and who is a self-willed person shown in 2024 itself, Chief Minister’s reply to Kunal Kamra
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप