विशेष प्रतिनिधी
नाशिक : Dhananjay Munde शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिवेशनातील मंत्री धनंजय मुंडे यांच्या भाष्णवरून आता पुन्हा राजकारण रंगले आहे. त्याचबरोबर पहाटेच्या शपथविधी वरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. धनंजय मुंडेंचा कालच्या भाषणात रोख कोणाकडे होता? षडयंत्र कोणी रचले? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.Dhananjay Munde
धनंजय मुंडे यांनी 2019 मध्ये अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी करु नये म्हणून त्यांच्या पायावर डोकं ठेवलं होतं. हे षडयंत्र असल्याचे त्यांना सांगितले होते. मात्र अजितदादांनी माझे ऐकले नाही, असा गौप्यस्फोट केला. अजित पवारांना पक्षातून काढण्याचे त्यांच्या विरोधातील हे षडयंत्र असल्याचा दावा मुंडेंनी केला, मात्र हे षडयंत्र कोणी रचले हे सांगितले नाही. त्यांच्या या दाव्यावर पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी षडयंत्र कोणी केले होते? काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना की राष्ट्रवादी किंवा भाजपच्या लोकांनी षडयंत्र रचलं का? असा सवाल केला आहे.
छगन भुजबळ यावर म्हणाले, धनंजय मुंडेंनी शिर्डीत केलेल्या भाषणाबद्दल विचारण्यात आले. त्यावर छगन भुजबळ म्हणाले, धनंजय मुंडे यांचं भाषण झालं तेव्हा मी त्या ठिकाणी नव्हतो. मात्र माध्यमातून त्याबद्दल ऐकलं. अजित दादांविरोधात षडयंत्र होतं तर कुणी रचलं? असा थेट सवाल त्यांनी केला. षडयंत्र उद्धव ठाकरे, काँग्रेसने रचलं नसेल. राष्ट्रवादी किंवा भाजपच्या लोकांनी रचलं का? असा सवाल त्यांनी केला.
भुजबळ म्हणाले, मला एवढं मात्र आठवतं की सत्ता स्थापनेच्या मिटिंग सुरु होत्या. उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस नेते यांच्या बैठका होत होत्या. तेव्हा एका बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांच्यात वाद झाला होता. शरद पवार बैठकीतून निघून गेले. पण त्यानंतरही प्रमुख नेत्यांच्या बैठका होत होत्या. राष्ट्रवादीची मिटिंग बोलवली गेली होती. मात्र या बैठकीला अजित पवार उपस्थित नव्हते. नंतर अजित पवार थेट टीव्हीवर दिसले. त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती.
अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर मी शरद पवार यांच्याकडे गेलो होतो असे सांगत छगन भुजबळ म्हणाले, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंनाही फोन केला होता. आपण मजबूतीने उभं राहिलं पाहिजे. कामाला लागू सांगितलं. आम्हाला काही कल्पना नव्हती, काय झालं, कसं झालं. इकडे, तिकडे गेलेले आमदार शोधायला सुरुवात केली. मी स्वतः अजित दादांच्या घरी गेलो होतो. असं करु नका म्हणून सांगितलं. सत्ता सोडून पवार साहेबांकडे या असं मी सांगितले. असंही भुजबळांनी सांगितले. ते म्हणाले की, आमच्या पक्षाची बैठक झाली त्यात मी स्वतः ठराव मांडला. चूक झाली असेल तर जाऊ द्या सांगितले. उपमुख्यमंत्री कोणाला करायचे असा प्रश्न जेव्हा आला तेव्हा अजित दादांनाच उपमुख्यमंत्री करा हे सुद्धा मी सांगितले, असेही भुजबळांनी सांगितले. मात्र कालच्या भाषणात धनंजय मुंडे यांचा रोख कोणाकडे होता? हे मला काही माहित नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.
Who was Dhananjay Munde addressing in yesterday’s speech? Who hatched the conspiracy? Question by Chhagan Bhujbal
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे, वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उदय सामंत यांनी सुनावले
- Prime Minister : पंतप्रधानांची ‘मन की बात’, वाशीमचे ‘स्टार्ट अप’चे केंद्र म्हणून कौतुक
- Gulabrao Patil : झोपेत असाल त्यावेळी ठाकरे गटाचे १० आमदार कधीही इकडे येतील, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा
- Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार