विशेष प्रतिनिधी
मुंबई : सरकार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री धनंजय मुंडेंना संरक्षण का देतेय असा थेट सवाल करत संभाजीराजे छत्रपती यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी राजपालांची भेट घेतली. ते म्हणाले, राज्यपालांनी सगळा विषय समजून घेतला आहे. संतोष देशमुख यांची जी क्रुर पणाने हत्या केली गेली ती खऱ्या अर्थाने माणुसकीची हत्या केलेली आहे. हा विषय जातीच्या पलीकडचा असल्यामुळे आम्ही सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांनी विनंती केलीय.
सामान्य माणसांचा जो काही आक्रोश चालु आहे ते महाराष्ट्राला परवडणारं नाहीये हे सांगण्यासाठी आलो. संताच्या महाराष्ट्रात अशा गोष्टी घडणं म्हणजे दुर्दैव आहे. त्यांनी आमची विनंती ऐकली. प्रामुख्याने आमची मागणी आहे की सात लोक जे फरार आहेत त्यांना अजूनही अटक झाली नाही. त्यांना अटक झाली पाहिजे
जे अधिकारी नेमलेले आहे ते बीडमध्ये धनंजय मुंडे यांनी आणलेले आहेत. म्हणून एसआयटीमध्ये आयपीएस अधिकारी नेमावे अशी मागणी करत संभाजीराजे म्हणाले, विधानसभेच्या पटलावर स्वत: मुख्यमंत्री म्हणाले आम्ही सात जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे. पण वाल्मिक कराड याला 302 कलम लागावं ही आमची मागणी असल्याचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
Why are you protecting Dhananjaya Munde? Sambhaji Raje’s direct question to Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली