विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : नायलॉन मांज्याने जखमी होण्याच्या घटना सुरूच आहे. पतीसह दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेचा गळा कापला गेल्याची घटना मोना नाका उड्डाण पूल परिसरात घडली आहे. या महिलेवर एका खाजगी रुग्णालयात तब्बल चार तास शस्त्रक्रिया करण्यात आली. गळ्याला तब्बल 40 टाके घालावे लागले आहेत.
जखमी महिला व तिचे पती दुचाकी घेऊन जात असताना पतंग उडवण्याचा मांजा आल्यामुळे पतीने तो बाजूला केला. परंतु पाठीमागे बसलेल्या पत्नीच्या गळ्यात अडकल्याने तिचा गळा कापला गेला. तिने हाताने मांज्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला
परंतु बोटही कापल्या गेले. अशा परिस्थितीत गाडी बाजूला घेऊन पत्नीच्या गळ्याला रुमालाने बांधून रिक्षाच्या साहाय्याने तिला एका खाजगी रुग्णालयात घेऊन गेले असता गळ्याला 40 टाके द्यावे लागले अशी माहिती महिलेच्या पतीने दिली आहे.फक्त मांजावरच नव्हे तर पतंग उडविण्यावरच बंदी आणली पाहिजे अशी प्रतिक्रिया जखमी महिलेने दिली आहे.
सध्या शहरांमध्ये पोलीस प्रशासनातर्फे पतंगाच्या दुकानावर जिथे प्रतिबंधित मांजा दिसेल त्यांच्यावर कारवाई करणे सुरू असून आम्ही याबाबत जनजागृती सुद्धा करत आहोत अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त संपत शिंदे यांनी दिली आहे.
Woman’s throat cut with nylon sheath, 4 hours of surgery required 40 stitches
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली