विशेष प्रतिनिधी
बारामती : Ajit Pawar उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पाेलीसांनी चांगलेच झापले आहे. त्याचबराेबर पालकांनीही मुलांकडे लक्ष द्यावे असे सांगत अगदी जवळच्या कार्यकर्त्याचा मुलगा असेल आणि गुन्हे करत असेल तर मकाेका लावायला कमी करणार नाही, असा दम दिला आहे.Ajit Pawar
बारामतीमधील मारहाणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून संताप व्यक्त करताना अजित पवार म्हणाले, बारामतीत विकास कामे करतो आहे. पण काही जण वेडे वाकडेपणा करतात. एक जण तर फुटपाथवर गाडी लाऊन गप्पा मारत होते. पोलिसांना गाडी जप्त करायला सांगितली आहे. एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, त्यामध्ये दोन मोटरसायकलवरुन चार मुलं आली. त्यांनी एकाला मारमार मारलं. त्याला बेल्ट, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अजित पवारांच्या कितीही जवळच्या कार्यकर्त्याच्या मुलाने असं केलं तरी त्याला सोडणार नाही. तो असेच गुन्हे करत राहिला तर मकोका लावायला कमी करणार नाही.
अजित पवार म्हणाले, ‘वनवे, पार्किंग, गार्डन अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी कोणतेही गैरकृत्य खपवून घेतले जाणार नाही. पोलिसांनाही एक स्पेशल गाडी दिली जाईल, त्यांनी या सर्वांवर नजर ठेवायची आहे. कोणाचंही चुकीचं कृत्य खपवून घेतले जाणार नाही. गैरकृत्य करणारा अजित पवारांच्या कितीही जवळचा असला, तरी त्याला माफी नाही. कोणी काही चूक केली असेल तर त्यासाठी कायदेशीर मार्ग आहे. त्यांची पोलिसांकडे तक्रार करा, पण कोणीही कायदा हातात घेतला तर त्याला मकोका लावायला कमी करणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी बारामती येथील कार्यक्रमात दिला.
कोणी काही गैरकृत्य केलं आणि त्यानंतर माझ्याकडे येतात आणि म्हणातात दादा, पोटात घ्या. अरे काय पोटात घ्या? पोट फुटायला लागलंय. ज्यांनी फोन केला त्यांना लाज, शरम कशी वाटत नाही, असे म्हणत अजित पवारांनी गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही खडसावले आहे.
Won’t Spare Even a Party Worker’s Son from MCOCA: Ajit Pawar’s Stern Warning
महत्वाच्या बातम्या
-
मराठीचा आग्रह धरा, पण आंदोलन थांबवा, राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश
-
Sanjay Raut संजय राऊत यांनी सोडली टीकेची पातळी, मोदी शहांचा मियाँ म्हणून उल्लेख
-
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा निर्णय, इमर्जन्सीमध्ये अनामत रक्कम न घेण्याचा ठराव
-
Rahul Gandhi : आता काेणी केली बाेलती बंद, वक्फ विधेयकावर चर्चा सुरू असताना राहुल गांधींचे मौनव्रत