विशेष प्रतिनिधी
मुंबई : हे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे नाहीत, हे फार किरकोळ लोक आहेत. बाळासाहेबांशी त्यांनी तुलना करू नये. ते अत्यंत चिल्लर लोक आहेत, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनावले आहे. Eknath Shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबन गीत सादर करणारा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा शिंदे गटाच्या रडारवर आहे. त्याने जिथे हा कार्यक्रम सादर केला त्या स्टुडिओची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांनी या तोडफोडीचे समर्थन करत कामराला धडा शिकवण्याची भाषा केली आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, स्टुडियोची तोडफोड करणारे म्हणजे, गल्लीतल्या टोळ्या आहेत. दाऊद वगैरे टोळ्यांनी जसे कॉन्ट्रॅक्ट किलर्स नेमले होते तसे हे राजकारणातले काँट्रॅक्ट किलर्स आहेत.
जेव्हा यांच्याकडे पैसे नसतील तेव्हा हे सर्व काँट्रॅक्ट किलर्स दुसऱ्या पक्षात जातील. जेव्हा सत्ता बदलेल तेव्हा हे सर्व भाडोत्री गुंड आमच्या दाराबाहेर उभे असतील. आम्ही यांना ओळखतो, कधी काळी यांनी आमच्यासाठीही काम केलेले आहे.
कुणाल कामरा याच्याबाबत शिंदे गट कायदेशीर भूमिका घेणार असेल तर, त्यांनी जरूर घ्यावी. पण कुणाल कामराने महाराष्ट्रात येऊ नये, हे ठरविणारे ते कोण? ते त्याचा खून करणार आहेत का? करणार असतील तर त्यांनी तसे जाहीर करावे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
You are very Chillar people, Sanjay Raut’s attack on Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला