विशेष प्रतिनिधी
मुंबई : Aditya Thackeray युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे जिल्हाप्रमुख माधव पावडे, महानगर प्रमुख पप्पू जाधव यांच्या सह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे.Aditya Thackeray
विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तरच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखासह इतर शिवसैनिकांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकला आहे. माधव पावडे यांनी शिवसेनेचे जिल्हा संघटक नेताजीराव भोसले महानगर प्रमुख पप्पू जाधव , तालुका प्रमुख गणेश शिंदे, युवा सेना जिल्हाप्रमुख बालाजी शिंदे , युवती सेना जिल्हाप्रमुख रोहिणी कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पावडे, दर्यापूरचे सरपंच विलास सूर्यवंशी, युवा सेना शहर प्रमुख अभिजीत भालके, सभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे यांच्यासह अनेकांनी आज मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला.
पावडे हे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. पक्ष फुटीनंतरच ही माधव पावडे यांनी ठाकरे गटाची साथ सोडली नाही. मात्र सलग विधानसभा निवडणुकीत दोन वेळा उमेदवारी नाकारल्याने अखेर पावडे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत सोडचिठ्ठी दिली. दरम्यान नांदेडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अनेकजण राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत आहेत.
नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना वाढविण्यात मोठे योगदान असलेले माधव पावडे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला नांदेड उत्तरमधून उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाने पावडे यांना उमेदवारी न देता अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी संगीता पाटील डक यांना उमेदवारी जाहीर केली. निष्ठावंताला सोडून अन्य संधी दिल्याने माधव पावडे यांच्यासह अनेक पदाधिकारी नाराज होते. यासाठी निवडणूकीदरम्यान नाराज शिवसैनिकांनी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला. याच दरम्यान माधव पावडे यांना पदावरून हटवण्यात आले. त्यामुळे ते नाराज झाले होते.
Yuva Sena chief Aditya Thackeray’s trusted leader entered in Ajit Pawar’s NCP
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली