विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mumbai Municipal मुंबईत दादर, फोर्ट, माटुंगा अशा ठिकाणी अनेक वर्षांपासून जुने कबुतरखाने आहेत. या बरोबर मु्ंबईच्या उपनगर परीसरातदेखील कबुतरांना खाणे देण्यात येते. यामुळे मुंबईतील रहीवाशी परीसरात मोठ्या प्रमाणात कबूतरे आढळून येतात. कबूतरांनमुळे होणार्या ञासांवर आता उपाय म्हणून मुंबई महापालिकेने ५०० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.Mumbai Municipal
कबुतराला खाणे देण्याविरोधात पालिकेकडे अनेक तक्रारी केल्या जातात. परंतु मुंबई महापालिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नाही, असा संताप वारंवार मुंबईकरांकडून व्यक्त केला जातो. परंतु आता पालिकेने कबुतरांना खाणे देणाऱ्यावंर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
कबुतरांच्या विष्ठेमुळे अस्वच्छता, रोगराई पसरते, अनेक आजार पाहायला मिळतात. यात अस्थमा , श्वसनाचे त्रास आजार असणाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसतो, अस्थमा आजार असणाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसतो. शिवाय कबुतरांच्या खाद्याची घाण, पिसे आणि दुर्गंधीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदुषणातही वाढ होते. याची उपाययोजना म्हणून पालिका आता बेकायदेशीरपणे कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.
कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वासनलिकेला सूज , फुफ्फुसांना सूज येणं, राइनायटिस, त्वचेची अॅलर्जी, डोळे लाल होणं, सायनसायटिस यांसारखे आजार होण्याची शक्यता असते.
500 rupees fine for feeding pigeons, Mumbai Municipal Corporation’s decision
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray उध्दव ठाकरे गोंधळलेत, काय बोलावे सुचेना, एकनाथ शिंदे यांचा टोला
- Chandrashekhar Bawankule’ : किती संभ्रमात, एकाकी व खचलेल्या मनस्थितीत, चंद्रशेखर बावनकुळे यांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल
- Praveen Tarde पुणेकरांचा लाडका मुरलीधर, प्रवीण तरडे यांनी केले जिवलग मित्राच्या भाषणाचे कौतुक
- Uddhav Thackeray: तुम्ही बच्चे होता तेव्हा, आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवू नका, उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर