Suresh Dhas : हरणाचे मटन खाल्ल्याच्या प्रकरणात अडकवून बिश्नोई गॅंग माझ्यावर सोडली, आमदार सुरेश धस यांचा आरोप

Suresh Dhas : हरणाचे मटन खाल्ल्याच्या प्रकरणात अडकवून बिश्नोई गॅंग माझ्यावर सोडली, आमदार सुरेश धस यांचा आरोप

Suresh Dhas

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Suresh Dhas हरणांची शिकार करणारा सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला अडकवण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात बिश्नोई समाजाचे लोक विमानाची तिकीटं फाडून थेट मुंबईत आणली गेली. बिश्नोई समाजाच्या लोकांना सुरेश धसांना खोक्यानं हरणाचं मांस कसं पुरवले याबाबत खोटी माहिती दिली. माझा खून करण्याचा डाव आखण्यात आला. ( Bishnoi gang plots to kill Suresh Dhas like Salman Khan!)Suresh Dhas

माझ्यावर एवढी वाईट पाळी आली का, माझ्या आयुष्यात 16 वर्षे मी माळकरी राहिलेला माणूस आहे, असे सांगून सुरेश धस म्हणाले, माझ्या आयुष्यात हरणाच्या मांसापर्यंत कधीच गेलो नाही. स्वत: प्राणी पशू पक्षी प्रिय माणूस आहे. मला काय माहिती त्यांच्या घरात काय सापडलं. त्याच्या घरात वाघार बिघारचं मांस सापडलं असेल. आता पारध्याच्या घरात थोडंच पंचांग वगैरे सापडणार आहे का? खोक्या वनविभागाच्या जागेत राहत होता. त्याची चार ते पाच लाखांची पण प्रॉपर्टी नसेल.



राजस्थानमधील बिश्नोई समाज हा काळवीटाला देवाचा अवतार मानतो. त्यांची घराघरात पुजा केली जाते. बिश्नोई समाजातील महिला आई नसलेल्या काळविटाच्या पाडसाला स्वतःचे दूध पाजून जगवतात. प्रसिद्ध अभिनेता सलमान खानने काळविटाची शिकार केल्यापासून लॉरेन्स बिश्नोई त्याच्या मागावर आहे., असे म्हटले जाते. 1998 साली बिष्णोई समाजानेच सलमानवर काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी राजस्थान न्यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणी सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा झाली.

सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसलेने दोनशेहून अधिक हरणांची शिकार केल्याचा आरोप आहे. त्याच्या घरात हरणाचे मांस सापडले होते. खोक्या हरणाच्या मटणाचा डबा सुरेश धस यांच्या घरी पाठवायचा असेही आरोप झाले होते. याच अनुषंगाने बिश्नोई गॅंगला आपल्याला मारण्यासाठी कट रचल्याचा आरोप धस यांनी केला आहे.

A ccused me of eating deer meat to kill by Bishnoi gang, alleges MLA Suresh Dhas

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023