विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : कल्याण पूर्वेकडील एका 13 वर्षीय मुलीचं अपहरण करत, तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने रविवारी सकाळी तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केली. पहाटे 4 ते 5 च्या सुमारास शौचालयात गळफास लावून घेतला. या आत्महत्येची न्यायाधीशांकडून चौकशी केली जाणार आहे. Kalyan rape case
कारागृहात पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास विशाल गवळी याने शौचालयात जाऊन गळफास लावून घेतला. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून विशाल गवळी याने स्वत:च्या घरी आणले होते. त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कोणाला कळू नये म्हणून विशालने घरातच या मुलीची हत्या केली होती. त्यानंतर विशाल गवळीने या मुलीचा मृतदेह बापगाव परिसरात फेकून दिला होता. त्यानंतर विशाल गवळी हा शेगावला पळून गेला होता. शेगाव पोलिसांनी सापळा रचत शिवाजी चौकातील एका सलूनमधून त्याला ताब्यात घेतले होते.
या अपहरण आणि हत्या प्रकरणात विशाल गवळीच्या तिसऱ्या पत्नीने त्याला मदत केली होती. विशाल गवळीने पहिल्या दोन बायकांप्रमाणे आपल्याला सोडून देऊ नये यासाठी पत्नीने या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याचे नंतर सांगितले होते. एका रिक्षातून मृतदेह भिवंडीजवळील बापगाव परिसरात दोघांनी मिळून फेकून दिला.
Accused in Kalyan rape case commits suicide in jail
महत्वाच्या बातम्या