विशेष प्रतिनिधी
मुंबई : राेखठाेक बाेलण्यासाठी प्रसिध्द असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit pawar यांनी कार्यकर्त्यांशी बाेलताना सध्याच्या राजकारणाच्या स्थितीचे विदारक वर्णन केले आहे. अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिलेले नाहीत, त्यामुळे त्याच्या पाया पडायच्या भानगडीत पडू नका असा सल्ला अजित पवार Ajit pawar यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सेवा दलाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. या कार्यक्रमात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी मनमाेकळा संवाद साधत अनेक सूचना केल्या. ते म्हणाले, काम करताना चुकीचं वक्तव्य तुमच्या तोंडून बाहेर पडता कामा नये, बोलता बोलता चुकीचा शब्द बाहेर पडतो, त्यामुळ प्रॉब्लम होतात. ते व्हायला नको. आपल्याला आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे.
आपण छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांचे आहोत हे सांगता आलं पाहिजे. अनेक लोक पक्षात येऊ पाहत आहेत, पण येणाऱ्यांची जनमानसात चांगली प्रतिमा पाहिजे. आधीच कोणी चुकी केली असेल आणि मग त्याचा विचार असेल की सत्ताधारी पक्षात जाऊ असे असेल तर तसं होणार नाही. उद्या पेपरात फोटो यायचा अमुक पक्ष प्रवेश झाला म्हणून. आपण भाषणात जे काही सांगू ते कृतीत आलं पाहिजे. कारण आपण यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आहोत.
आज केंद्रात स्थिर सरकार आलं आहे, राज्यात महायुतीचे सरकार आहे. आपण लाडक्या बहिणींची चर्चा केली. काम करताना आपण पारदर्शकपणे भूमिका घेतली पाहिजे, त्यामुळ तसे सांगणे गरजेच असते. काही वेळा लोकांना वाईट वाटते, असेही अजित पवार Ajit pawar म्हणाले.
Ajit pawar has revealed the merits of leaders, there is no need to be humble.
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप