विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ajit Pawar राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर काेसळले. त्यावेळी भाजप आणि शिंदे गटावर तत्कालीन विराेधी पक्षनेते अजित पवार तुटून पडत हाेते. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना तर त्यांच्या रसवंतीला बहर फुटत असे. आपल्या शैलीत ते एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा समाचार घेत. त्यातील स्वत:च्याच एका व्हिडीओवर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच वैतागले आहेत.Ajit Pawar
प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल व्यंगात्मक गाणे म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला. या वादाचे पडसाद विधिमंडळातही उमटले. शिवसैनिकांनी त्याच्या कार्यालयाची तोडफोड केली. तर, दुसरीकडे खार पोलिसांनी त्याच्याविरोधात समन्स बजावला. यावेळी एका वृत्तसंस्थेला माहिती देताना तो या विधानावर ठाम असून तो माफी मागणार नसल्याचे सांगितले. सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच विरोधीपक्षपदी असताना हे सर्व म्हटल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अजित पवार यांचा जुना व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल हाेऊन चर्चेत आला आहे. यामध्ये अजित पवार हे शिवसेना शिंदे गटाला गद्दार म्हणत असल्याचे दिसत आहे.
पत्रकारांनी यावरून अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही मागच्या काळात विरोधी पक्षनेता होते. यावेळी मी जे काही बोललो त्यावेळेची भूमिका ही त्या परिस्थितीला अनुसरून बोललो. त्यानंतर आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरे गेलो. जनमताचा कौल आम्हाला मिळाला. त्याच्यामुळे अशा जर मागच्या गोष्टी कोणी कोणी काय काय बोलले? त्यावर विविध प्रकारची विधाने केली जातात. आम्हीत एकत्र आहोत, एकत्र काम करत आहोत आणि राज्याला पुढे घेऊन जाण्याचा मनापासूनचा प्रयत्न करत आहोत.
शिवसेनेत फुट पडल्यानंतर आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपशी युती केल्यानंतरचा हा व्हिडीओ असून यावेळी अजित पवार हे महाविकास आघाडीमध्ये होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले आहे. यानंतर आता पत्रकार परिषदेमध्ये याबाबत प्रश्न विचारला असता, तेव्हा मी विरोधात होतो. आता कशाला तो विषय काढतात? असे म्हणत त्यांनी आपला वैताग व्यक्त केला.
Ajit Pawar upset over his own video
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप