मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्ला याची पत्नी गीता शुक्लाला अटक

मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्ला याची पत्नी गीता शुक्लाला अटक

विशेष प्रतिनिधी

मुंबई : योगीधाम अजमेरा सोसायटी मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याची पत्नी गीता शुक्लासह विवेक जाधव, पार्थ जाधव या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अखिलेश शुक्लाचे दोन सहकारी सुमित जाधव आणि दर्शन बोराडे यांना पोलिसांनी काल अटक केली होती. सहा आरोपींना खडकपाडा पोलीस कोर्टात हजर करणार आहेत.

अखिलेश शुक्ला यांनी शेजारी राहणाऱ्या देशमुख कुटुंबीयांना गुंड आणून मारहाण केली होती. देशमुख कुटुंबातील दोघा भावांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली होती. तसेच महिलांना देखील मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकाराची दखल हिवाळी अधिवेशनातही घेण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिलेश शुक्लाला तात्काळ निलंबित करण्याची घोषणा केली होती.

Sharad Pawar ऊसाला जास्त भाव मिळावा यासाठी शरद पवारांनी पत्र लिहायला हवे होते, सदाभाऊ खोत यांचा सल्ला

दरम्यान, एमटीडीसी विभागात अधिकारी पदावर काम करणाऱ्या शुक्लाची संपत्ती प्रमाणाहून अधिक असल्याचा आरोप करत त्याची चौकशी केली जावी, अशी मागणीही स्थानिक रहिवाशांनी केली आहे. तसेच देशमुख कुटुंबीयांवरील गुन्हा मागे घेण्याचीही मागणी केली जात आहे.

अखिलेश शुक्ला हा आयएएस अधिकारी असल्याचे सांगून स्थानिक रहिवाशांना धमकावत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. शुक्लाच्या खासगी गाडीत अंबर रंगाचा दिवा आढळला होता. मात्र, त्याचा हाच माज उतरवत कल्याण खडकपाडा पोलिसांनी अखिलेश शुक्लाची गाडी जप्त केली. या गाडीमधून अंबर दिवाही पोलिसांनी हस्तगत केला आहे.

Akhilesh Shukla’s wife Geeta Shukla arrested in assault case

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023