विशेष प्रतिनिधी
मुंबई : Aditya Thackeray अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन बलात्कार आणि हत्या प्रकरणात माजी मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. विधानसभेत आज त्यांच्या अटकेची मागणी झाली आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी हे प्रकरण कोर्टात आहे, कोर्टातच पाहू असे उत्तर दिले आहे. गेली पाच वर्षे सातत्याने बदमानीचा प्रयत्न होत आहे, असेही ते म्हणाले.Aditya Thackeray
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशाच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत शिवसेना ( ठाकरे गट ) नेते आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची आणि तपास ‘सीबीआय’कडे सोपवण्याची विनंती करण्यात आली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “ आम्ही सरकारला एकाच अधिवेशनात उघडे पाडले आहे. फक्त आम्ही नाही, तर संघाने सुद्धा उघडे पाडले आहे. महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्येवरून महाराष्ट्राची वाट बिकट होत आहे. हे सरकार निवडणूक आयोगामुळे निवडणूक जिंकले आहे. तरीदेखील सरकारचे 10 मुद्दे अधिवेशनात आले नाहीत. आम्ही सरकारला उघडे पाडले, एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. हे सगळे झाल्यावर आता माझ्यावरून सभागृह बंद पाडले जात आहे. तर, सभागृह बंद पाडु द्या. पण, तुम्ही सत्ताधारी पक्षातील आमदारांना महाराष्ट्राबद्दल बोलायला निवडून दिले आहे. तर महाराष्ट्राबद्दल बोला आणि चर्चा करा.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार कोणावरही बलात्काराचा आरोप असेल तर सर्वात पहिले त्याच्याविरोधात केस रजिस्टर करावी लागते. त्या नियमानुसार, केस दाखल करून आदित्य ठाकरेंना अटक करावी. ज्यांची नवे या प्रकरणात असतील त्यांची चौकशी करावी. जो न्याय अन्य लोकांना लागतो, तोच न्याय आदित्य ठाकरेंना लावावा अशी मागणी मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
Allegations in Disha Salian case, Aditya Thackeray said we will see in court
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार