विशेष प्रतिनिधी
पुणे : वडिलांच्या उपचाराच्या नावाखाली खोटे बोलून पैसे घेतल्याने आयटी कंपनीतील तरुणीचा मित्रानेच केले कोयत्याने सपासप वार करून खून केला. पोलीस तपासात खुनाचे धक्कादायक कारण समोर आले
येरवडा परिसरातील रामवाडी येथील एक पार्किंगमध्ये उसन्या पैशांच्या वादातून तरुणी करुन तिचा निर्घण खुन करण्यात आला आहे.
शुभदा शंकर कोदारे (वय २८, रा. बालाजीनगर, कात्रज) असे खुन झालेल्या तरुणीचे नाव आहे. येरवडा पोलिसांनी कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय ३०, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर) याला अटक केली आहे. कृष्णा याने शुभदा हिच्यावर इतका जोरात वार केला की त्यात तिचा उजवा हात तुटला. अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यु झाला. ही घटना रामवाडीतील डब्ल्युएनएस या बहुराष्ट्रीय आय टी कंपनीत मंगळवारी पंकाळी सव्वासहा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभदा कोदारे ही तरुणी मुळची कराड येथे राहणारी आहे. ती रामवाडी येथील डब्ल्युएनएस या बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये अकाऊंटट म्हणून कामाला होती. तिच्याच विभागात कृष्णा कनोजा काम करत आहे. उसन्या पैशांवरुन त्यांच्यात वाद झाला होता. कंपनी सुटल्यानंतर ती कंपनीच्या पार्किंगमध्ये आली.यावेळी त्याने तिच्यावर हल्ला केला.
An IT engineer girl was killed for taking money by lying in the name of her father’s treatment
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली