Arjun Khotkar अर्जुन खाेतकरांनी हात लावला तेथे केली माती, अंजली दमानिया यांचा माेठा लढा उभारण्याचा इशारा

Arjun Khotkar अर्जुन खाेतकरांनी हात लावला तेथे केली माती, अंजली दमानिया यांचा माेठा लढा उभारण्याचा इशारा

विशेष प्रतिनिधी

जालना : मंत्री र्जुन खोतकर Arjun Khotkar यांनी जिथे-जिथे हात लावला तिथे-तिथे त्यांनी माती केली. जनता सहकारी साखर कारखाना असो, जालन्याची कृषी उत्पन्न बाजार समिती असो किंवा खरेदी-विक्री केंद्र असो या प्रत्येक ठिकाणी अर्जुन खोतकर यांनी माती केली आहे, असा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी के अर्जुन खोतकर यांच्याविरुद्ध मोठा लढा उभा करण्याचा इशारा दिला आहे. Arjun Khotkar

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आतापर्यंत अनेक गैप्रकारांना वाचा फोडली आहे. याआधी माजी मंत्री एकनाथ खडसे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. आता त्यांनी अर्जुन खाेतकर यांच्या विराेधात लढा उभारण्याची वेळ आली आहे, असा सूचक इशारा दिला आहे.

अंजली दमानिया यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणही लावून धरलेले आहे. याच काळात त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर स्वरुपाच्या आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा आता माजी मंत्री तथा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. दमानिया यांनी एका सभेत बोलत असताना खोतकर यांचे नाव घेऊन त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली आहे.

त्यामुळेच अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केल्यानंतर आता अंजली दमानिया नेमकं काय करणार? धनंजय मुंडे यांच्यावर ज्या पद्धतीने त्यांनी आरोप केले होते, त्याच पद्धतीने त्या अर्जुन खोतकर यांच्यावरही वेगवेगळे आरोप करणार का? असे विचारले जात आहे.

Anjali Damania warned to raise the agitation against Arjun Khotkar

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023