विशेष प्रतिनिधी
मुंबई : जरा जपून, आपण मनापासून हात पूढे कराल आणि भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील, असा आपुलकीचा सल्ला सन्माननीय राजसाहेब आपणास देतो असे शिंदे गटाचे नेते आणि गृह राज्य मंत्री योगेश कदम यांनी म्हटले आहे. एक आपुलकीचा सल्ला –
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपले मोठे बंधू, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यावर शिंदे गटाचे नेते आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी राज ठाकरे यांना ‘आपुलकीचा सल्ला’ दिला आहे.योगेश कदम यांनी ‘X’ या सोशल मीडियावर पोस्ट करून राज ठाकरे यांना आपुलकीचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सन्माननीय राजसाहेबांना एक आपुलकीचा सल्ला –
उबाठा गटाच्या प्रमुखांची निती ही ‘वापरा आणि फेकून द्या’ ही राहिलेली आहे.
स्वत:चा स्वार्थ साधुन झाला की त्यांना
रक्ताची नाती सुद्धा नकोशी होतात आणि याचा प्रत्यय खुद्द सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना देखील आहे. याशिवाय शिवसेनेचे पहिल्या फळीतले नेते श्री. नारायणजी राणे, स्व.श्री. मनोहरजी जोशी, श्री. दिवाकरजी रावते, श्री. लीलाधर डाके, श्री. रामदासभाई कदम आणि श्री. एकनाथजी शिंदे यांना सुद्धा गरज सरो नी वैद्य मरो प्रमाणे कसे डावलले हे वेगळ्याने सांगायला नको.
त्यामुळे आपुलकीचा एकच सल्ला देतो – जरा जपून, आपण मनापासून हात पूढे कराल आणि भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील.
प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा टाळी देण्याबद्दल राज ठाकरे यांनी टिप्पणी केली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का? असा सवाल महेश मांजरेकर यांनी केला असता, राज ठाकरे म्हणाले, ‘कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणे किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे, एकत्र राहणे यात फार कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आहे, कारण हा माझ्या एकट्याचा विषय नाही.’ याला उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
सन्माननीय राजसाहेबांना एक आपुलकीचा सल्ला –
उबाठा गटाच्या प्रमुखांची निती ही ‘वापरा आणि फेकून द्या’ ही राहिलेली आहे.स्वत:चा स्वार्थ साधुन झाला की त्यांना
रक्ताची नाती सुद्धा नकोशी होतात आणि याचा प्रत्यय खुद्द सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना देखील आहे. याशिवाय शिवसेनेचे पहिल्या…— Yogesh Ramdas Kadam (@iYogeshRKadam) April 20, 2025
Be careful, put your hands forward and your feet will be pulled… Shinde’s leader’s affectionate advice to Raj Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : उध्दव – राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले
- Chief Minister : तंत्रज्ञानाच्या मदतीने शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा, मुख्यमंत्र्यांचे डाॅक्टरांना आवाहन
- Supreme Court : मग संसद भवनच बंद करा.. उपराष्ट्रपतींपाठाेपाठ भाजपचे खासदार सर्वाेच्च न्यायालयावर बरसले
- West Bengal : हिंदू असणे हा आमचा गुन्हा आहे का? पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागातील महिलांची राज्यपालांपुढे कैफियत