विशेष प्रतिनिधी
नागपूर : वाळू माफियांची दादागिरी मोडून काढणार असल्याचा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
नागपूर मध्ये पत्रकारांची बोलताना बावनकुळे म्हणाले, मला महसूल खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री यांनी दिली आहे.संपूर्ण महसुली कायद्यांना शेतकरी शेतमजुरांना समाजातील शेवटच्या माणसाशी संबंध असलेल्या महसूल खात्यात कायद्यात सुधारणा आवश्यक आहे. छोट्या छोट्या कारणामुळे विकास प्रकल्प थांबल्या त्याला पुढे नेण्याचे काम करू. 86 हजार हेक्टर झुडपी जंगल नसताना त्याची नोंदी केले आहे. त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टात ते सुरू आहे..लवकर झुडपी जंगल मुक्त होईल.विदर्भातील झुडपी जंगल जमिनीमुळे विकास प्रकल्प थांबले आहे.
सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडून महसूल विभागाचे व्हिजन सांगताना बावनकुळे म्हणाले, देशात काय सुलभीकरण झालं जनतेला घरी बसून संपूर्ण डॉक्युमेंट ऑनलाइन काढता येतील, जनतेची फरपट थांबतील होईल असा बदल करून जनतेला देऊ, महसूल खात्याकडून होणारा त्रास थांबेल.
मंत्रिमंडळाचे खाते वाटप अखेर जाहीर, बावनकुळे महसूल मंत्री, शिंदेंकडे नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम
12 जिल्ह्यात मंत्री नसले तरी, या पद्धतीने खातेवाटप पार पडला त्याच पद्धतीने पालकमंत्री पदाचा वाटप होईल, त्यात वाद होणार नाही, असे ते म्हणाले. परभणीच्या घटनेतील आरोपी हा मनोरुग्ण आहे तरी यांना राजकारण करायचं असल्यामुळे त्या ठिकाणी घटना दुर्दैवी आहे.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरने राजकारणात पराभव करण्याचं काम केलं. सर्वसामान्यांना अधिकार मिळत असताना बाबासाहेब सभागृहात येणार नाही याची तयारी केली. काँग्रेसचा राहुल गांधी यांचा उद्याचा दौरा हा नौटंकी आहे.महाराष्ट्रातील समाज हा त्यांना साथ देणार नाही, असे ते म्हणाले.
ओबीसी नेत्यांच्या बैठकीबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महायुतीमध्ये भुजबळ साहेबांचा मोठा स्थान आहे… भुजबळ साहेबांच्या राजकीय आयुष्याचा योग्य निर्णय राष्ट्रवादी पक्ष घेईल अजितदादा, प्रफुल पटेल, सुनील तटकरे योग्य निर्णय घेतील.
Chandrasekhar Bawankule warned that Sand mafia’s tyranny will break out
महत्वाच्या बातम्या
- मंत्रिमंडळाचे खाते वाटप अखेर जाहीर, बावनकुळे महसूल मंत्री, शिंदेंकडे नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम
- Parliament : संसदेतील गोंधळाच्या तपासासाठी सात सदस्यीय एसआयटीची स्थापना
- मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्ला याची पत्नी गीता शुक्लाला अटक
- Devendra fadnavis : बीडमधील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणार, दोषींवर मकोकाअंतर्गत कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस