विशेष प्रतिनिधी
नागपूर : “सोशल मीडियाच्या माध्यमातून नागपूरमधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला. त्यातून दोन समाजात द्वेष निर्माण झाला. ज्याठिकाणी द्वेष निर्माण झाला, तिथे ही घटना घडली आहे. महाराष्ट्रात अशा घटना घडू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लक्ष ठेऊन आहेत. पोलिसांनी योग्यवेळेत घटना हाताळल्यामुळे दोन गटांतील संघर्ष थांबला, अशी माहिती नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी दिली .
नागपुरात सोमवारी दोन गटांत हिंसाचार होऊन परस्परांवर दगडफेक करून गाड्यांचीही जाळपोळ करण्यात आली. दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले आहेत. यानंतर बावनकुळे यांची सर्व घटनेचा आढावा घेतला आहे. याप्रकरणी 50 हून अधिक जणांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली आहे. मंत्री बावनकुळे आणि पोलीस आयुक्त हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
“नागपूर शहरात जिथे तणावपूर्ण परिस्थिती आहेत, तिथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचे लोकप्रतिनिधी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. माझी नागपूरकरांना हात जोडून विनंती आहे की, नागपूरची संस्कार आणि संस्कृती ही सर्वसमाजाला सोबत घेऊन काम करायची आहे. विरोधी पक्षाने या घटनेला राजकीयदृष्टीकोणातून पाहू नये. पुन्हा अशी घटना घडू नये, याची काळजी पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अधिक लक्ष सोशल मीडिया अकाऊंटवर आहे,” असे बावनकुळेंनी म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “अशी दुर्भाग्यपूर्ण घटना यापूर्वी कधीही नागपूरमध्ये घडली नाही. सर्व समाजाने आणि धर्मांनी अशा घटनेत शांतता प्रस्थापित करून मूळ समाजकंटकांना पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून मिनिट टू मिनिट माहिती घेतली आहे. पोलिसांनी पुढाकार घेऊन संपूर्ण परिस्थिती हाताळली आहे. 35 पोलीस अधिकारी आणि शिपाई जखमी झाले आहेत. 4 ते 5 नागरिक जखमी झाले आहेत. 50 ते 55 वाहने जाळण्यात आली आहेत.
Chandrashekhar Bawankule alleges an attempt to spoil the atmosphere in Nagpur through social media.
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप