विशेष प्रतिनिधी
मुंबई : हो मी नाराज आहे. का नाराज नसणार? चांगलं काम करत असताना कोणी काढून टाकल तर का नाराज नसणार असा सवाल माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
छगन भुजबळ नवी मुंबईतील कळंबोली मधील एका कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री मंडळात समावेश झाला नसल्याबद्दल त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली.
भुजबळ म्हणाले, मला कुणाचाही फोन आला नाही. कुणीतरी फोन करणार ही मीडिया मधील चर्चा आहे. मी भाजप मध्ये जाणार, मी नाराज आहे हे सगळं सोडून द्या.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर भुजबळ यांचा मंत्री मंडळात समावेश होण्याच्या चर्चेवर ते म्हणाले, कुणाचे मंत्रिपद जाऊन मला मिळावे अशी इच्छा मी जन्मातही करत नाही. धनंजय मुंडे यांची चौकशी होईल आणि जे काय करायचे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील. मला कुणाच्या राजीनाम्याची घाई करायची गरज नाही. धनंजय मुंडे यांच्यामुळे पक्ष अडचणीत येणार असेल तर ते अजित पवार पाहतील
यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी पवार कुटुंब तसेच ठाकरे कुटुंबानेही एकत्र यावं अशा शुभेच्छा दिल्या.
Chhagan Bhujbal said yes I am upset, why not?
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली