विशेष प्रतिनिधी
नागपूर : बीड प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने कारवाई करत आहेत. या प्रकरणात कोणी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही कोणालाही वाचवू देणार नाही. या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी आणि हफ्ते वसुली करतात, असा सगळ्यांवर आम्ही जरब बसवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे, या संदर्भात योग्य कारवाई सुरु आहे, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आंदोलन सुरू केले आहे. पंकजा आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून सातत्याने फोन येत असून धमक्या दिल्या जात असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला. यावर मुख्यमंत्री म्हणाले, अंजली दमानिया यांची काहीही तक्रार असेल तर त्यांनी ती पोलिसांकडे द्यावी, पोलीस यावर निश्चित कारवाई करतील.
दरम्यान, नागपूर शहर भाजपतर्फे आयोजित पक्षाच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमात त फडणवीस म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा देशातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. ११ कोटी सदस्यांची नोंदणी झाली आहे. बाकी सर्व पक्षात परिवारवाद आहे. मात्र भाजपमध्ये नाही.
Chief Minister Devendra Fadnavis warns against bullies and extortionists
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली