कल्याणमधील आरोपी विशाल गवळीला फाशी द्यावी मागणीसाठी नागरिकांचे आंदोलन

कल्याणमधील आरोपी विशाल गवळीला फाशी द्यावी मागणीसाठी नागरिकांचे आंदोलन

विशेष प्रतिनिधी

कल्याण : कल्याण पूर्वेत 23 डिसेंबरला अपहरण करुन एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी विशाल गवळी व त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांना अटक केली. विशाल गवळी याला फाशी द्यावी या मागणीसाठी आक्रमक होत नागरिकांनी आंदोलन केले.

दोन्ही आरोपींना पोलिसांनी कल्याण कोर्टात पोलिसांनी हजर केले. ही केस फास्टट्रॅक कोर्टात चालवा, विशेष न्यायाधीशांची नियुक्ती करा आणि आरोपीला चार महिन्यात फाशी द्या, जसा बदलापूर मधी मुलींना न्याय मिळाला तसा कल्याणमध्ये द्या या मागण्या करत नागरिकांनी आंदोलन केले.

कल्याण पूर्वेत 23 डिसेंबरला अपहरण करुन एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली होती. या मुलीचा मृतदेह 24 डिसेंबरला कल्याणनजीक असणाऱ्या बापगाव परिसरात आढळून आला. पोलिसांनी तपास सुरु केला असता यात मुख्य आरोपी विशाल गवळी असल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर आरोपी विशाल गवळी याच्या पत्नीची चौकशी केल्यानंतर तिने विशाल गवळीला यात मदत केल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला शेगाव, बुलढाणा येथून अटक केली व त्याची पत्नी साक्षी गवळी हिला देखील अटक करण्यात आली.

आज या प्रकरणी दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपीच्या वकीलांनी कोर्टाकडे एमसीआरची मागणी केली होती मात्र न्यायालयाने आरोपी विशाल गवळी आणि पत्नी साक्षी गवळीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास काम अजून पूर्ण व्हायचे आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांना या प्रकरणात मृतदेह टाकण्यासाठी वापरलेली बॅग आणि मोबाईलचे सिम कार्ड जप्त करायचे आहे त्यासाठी आरोपींना 4 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेच्या पार्श्वभूमीवर विशाल गवळी याचा देखील एन्काऊंटर होऊ शकतो त्यामुळे मी न्यायालयकडे मागणी केली आहे की जोपर्यंत आरोपी हा पोलीस कस्टडीत राहील तोपर्यंत त्याच्या नातेवाईकांना त्याच्या संपर्कात राहू द्या असा अर्ज आरोपीचे वकील अॅड. संजय धनके यांनी न्यायालयाला दिला आहे.

Citizens’ agitation demanding for Hanging accused Vishal Gawli in Kalyan

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023