विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nilesh Rane विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जितेंद्र आव्हाड आणि नीलेश राणे यांच्यात चांगलीच चकमक झडली. राजापूरच्या दंगलीच्या मुद्यावर दाेघांच्या वाद झाला.Nilesh Rane
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजापूरमधील एका दर्ग्याच्या जाळपोळीच्या घटनेचा उल्लेख केला. त्याच्या संदर्भात बोलताना ‘एक कॅबिनेट मंत्री उठतात, बाहेर जातात आणि आग लावण्याचा प्रयत्न करतात,’ असा उल्लेख आव्हाड यांनी केला. त्या विधानावर आक्षेप घेत आमदार नीलेश राणे हे त्या मंत्र्यांच्या मदतीला धावले आणि ‘राजापूरच्या घटनेशी त्या मंत्र्यांचा काय संबंध होता. तुमच्याकडे काय पुरावा आहे, हे आव्हाडांनी सांगावे, असे आव्हानही दिले.
जितेंद्र आव्हाड हे विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत होते. ज्या राजापूरमधून बॅरिस्टर नाथ पै आले, ज्या राजापूरमधून मधू दंडवते आले. ज्या राजापूरने यापूर्वी कधीही हिंदू- मुसलमान वाद बघितला नाही. त्याच राजापूरमध्ये चौघे जाऊन दर्गा जाळतात. दर्गा जळत होता. मुसलमान घाबरले होते. कोणीही जवळ जायला तयार नव्हतं. अखेर गावातील सगळे हिंदू बाहेर आले, ते दर्ग्याजवळ गेले आणि त्यांनी ती आग आटोक्यात आणली. ही हिंदूंची ओळख आहे.
वसुधैव कुटुंबकम म्हणणारे आम्ही हिंदू आहोत. परंपरा पाळणारे आम्ही हिंदू आहोत. बंद करा हे सर्व, महाराष्ट्र जाळू नका. महाराष्ट्राला जाळून राख करून टाकाल. तुमच्यातील एक मंत्री. कॅबिनेट म्हणजे सामूहिक जबाबदारी असते ना. का ही जबाबदारी फक्त तुमच्या लोकांपुरती मर्यादित आहे. मला विखे साहेबांकडून ती जाणून घ्यायची आहे. कॅबिनेट मंत्र्यांची जबाबदारी ही फक्त कॅबिनेटपुरती मर्यादित असते की बाहेरही गेल्यावर त्यांची तीच जबाबदारी असते. मग शपथ कशाला घेता? असा सवाल आव्हाड यांनी केला.
शपथ संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्री म्हणून घेता ना. एक मंत्री उठतात, बाहेर जातात आणि आग लावण्याचा प्रयत्न करतात. त्यावर मुख्यमंत्री आणि कॅबिनेट काहीच बोलत नाही. कधी औरंजेबावरून आग लागते, तर कधी हलाल की झटका यावरून. आव्हाड बोलत असताना, त्यांच्या विधानावर आमदार नीलेश राणे यांनी आक्षेप घेतला. पण, मी कोणाचंच नाव घेतलं नाही, असे आव्हाड म्हणत होते. पण, राणेंना अध्यक्षांनी बोलण्याची परवानगी दिली. ते म्हणाले, एक मंत्री बाहेर गेले आणि आग लावली, याचा काय अर्थ होतो, हे आव्हाड यांनी सभागृहाला सांगावं.
राजापूरच्या घटनेशी त्या मंत्र्यांचा काय संबंध होता. त्यांच्याकडे काय पुरावा आहे का, हेही आव्हाड साहेबांनी सभागृहाला सांगावं. राजापूरमध्ये नेमकं काय घडलं, हे त्यांना माहीत आहे का, असा सवालही त्यांनी केला. आव्हाडसाहेब तुम्ही राजापूरचे नाहीत, तुम्हाला माहिती नाही. परिस्थिती पहिल्या तासापासून कंट्रोलमध्ये होती. ‘आऊट ऑफ कंट्रोल’ नव्हती. तुम्ही एका मंत्र्यांवर आरोप करता, त्यांसदर्भात तुमच्याकडे कसला पुरावा आहे का, असे आव्हानही त्यांनी दिले.
नीलेश राणेंच्या आरोपावर जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहाचे नियम मलाही माहिती आहेत. पण मला त्याच्यावर काही बोलायचे नाही. मी हलाल आणि झटक्यावर बोलत होतो. त्यासंदर्भात मला माहिती हवी आहे, ऑन रेकॉर्ड माहिती हवी आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात झटका मटनाची किती दुकानं आहेत, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.
Clash between Jitendra Awhad and Nilesh Rane in the Assembly over Rajapur riots
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप