विशेष प्रतिनिधी
मुंबई : Namita Mundada भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी बीडचे जिल्हा शल्क चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी कोरोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. डॉ. अशोक थोरात यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी विधानसभेत केली. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर तातडीने निर्णय यांनी थोरात यांना निलंबित केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे अशोक थोरात पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे ओएसडी होते. नमिता मुंदडा या विमल मुंदडा यांच्या स्नुषा आहेत.Namita Mundada
विधानसभेत आमदार नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी मांडत म्हटले की, बीडचे जिल्हा शल्क चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी कोरोना काळात प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार बीडमध्ये झाला आहे. भ्रष्टाचार झाल्यानंतर त्यांची या प्रकरणात चौकशी झाली. या चौकशीत ते दोषी सापडले होते. दोषी सापडल्यानंतर त्यांची बदली नाशिकला करण्यात आली. तिथे त्यांनी केले हे माहीत नाही. पण त्यानंतर परत जिथे भ्रष्टाचार झाला तिथे बीडमध्ये त्यांची सिव्हिल सर्जन म्हणून बदली करण्यात आली. हे बरोबर आहे का? जिथे इतका मोठा प्रचंड भ्रष्टाचार झाला, त्यांना पुन्हा इकडे परत कसे आणले गेले? या व्यक्तीवरती तुम्ही गुन्हा दाखल करणार का? त्यांचे तुम्ही निलंबन करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावर आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या कामकाजाबद्दल खूप गंभीर आक्षेप आहेत. निश्चितपणाने सिव्हिल सर्जन अशोक थोरात यांना आपण सस्पेंड करत आहोत. त्यांना निलंबित करून तीन महिन्यांच्या कालावधीत चौकशी पूर्ण करण्यात येईल. यात जे दोष आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा शिवविच्छेदनाचा अहवाल डॉक्टर अशोक थोरात यांनी दिला होता. अंजली दमानिया यांनी आरोप केल्यानंतर अंबाजोगाई येथील हॉटेल चर्चेत आले होते. अंजली दमानिया यांनी म्हटले हाेते की, हॉटेल पियुष इन हे अंबेजोगाई येथील होटल कोणाचे आहे ? मला अशी माहिती मिळतेय की डॉ अशोक थोरात यांचे आहे. हे बीड रुग्णालयात सिविल सर्जन आहेत. ह्याची चौकशी व्हायला हवी. त्यांच्याच अधिपत्याखाली संतोष देशमुख यांचे शव विच्छेदन झाले. वाल्मीक कराड यांना दोनदा रुग्णालयात आणण्यात आले. ११ रुग्णांना बाहेर काढून एका ठणठणीत गुन्हेगाराला ICU मधे ठेवण्यात आले. हे पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे OSD होते. मग बीडहून नाशिकला बदली केली आणि आत्ता मोठ्या आशिर्वादाने पुन्हा बीड मधे आगमन झाले आहे.
Complaint against mother-in-law’s OSD, Dr. Ashek Thorat suspended on complaint of Namita Mundada
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप