विशेष प्रतिनिधी
Mumbai News: मला प्रेमजाळ्यात फसवून लग्न केल्यास त्याला २० लाख देण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे. मुंडे यांची गँग हे षडयंत्र रचत आहे. धनंजय मुंडे यांचं एवढं डोकं नाही. बीडचा आका आत गेला आहे, पण आता हे काम पुण्याचा आका करत आहे, असा आरोप धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनी केला आहे.
करुणा मुंडे याच धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पहिल्या पत्नी आहेत, असे मान्य करून महानगर दंडाधिकाऱ्यांनी पाेटगी देण्याचे आदेश दिले हाेते. या विराेधात धनंजय मुंडे यांनी दाखल केलेली याचिका माझगाव सत्र न्यायालयानं फेटाळली आहे. करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचा निकाल न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आला आहे. करुणा शर्मा यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे धनंजय मुंडेंची याचिका न्यायालयानं फेटाळली आहे. करुणा शर्मा यांनी न्यायालयामध्ये धनंजय मुंडेंचं स्वीकृतीपत्र आणि अंतिम इच्छापत्र तसेच आपला पासपोर्ट आणि रेशनकार्ड न्यायालयात सादर केलं. या कागदपत्रांवर न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं आहे, त्यामुळे करुणा शर्मा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे ही कागदपत्रं खोटी असल्याचा दावा धनंजय मुंडे यांच्या वकिलाकडून करण्यात आला आहे.
निकालानंतर करुणा शर्मा पत्रकारांशी बाेलताना म्हणाल्या, जो करूणा मुंडे हिला त्याच्या प्रेमात अडकून फसवेल आणि लग्न करेल, अशा व्यक्तीला धनंजय मुंडे यांचे दलाल राज घनवट, पुरषोत्तम केंद्रे, वाल्मिक कराड, तेजस ठक्कर हे लोकं २० कोटी रूपये देतील. धनंजय मुंडे यांनी राज घनवट, पुरषोत्तम केंद्रे, वाल्मिक कराड, तेजस ठक्कर यासारखे दलाल लोकं पाळली आहेत. हे पाळलेले दलाल धनंजय मुंडे यांना दारू आणि मुली पुरवत आहेत.
मी न्यायाधीश यांचे आभार मानते की मला न्याय मिळाला. आज सत्याचा विजय झाला. मी सात ते आठ वेळा धनंजय मुंडे यांना तोंडावर पाडलं आहे. महिलांसाठी ही एक आदर्श केस आहे. राज्याची सिस्टीम ढासळली आहे, मी खरी होते, म्हणून मंत्र्यांना हरवू शकले. मीच मुंडे यांची पहिली बायको असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यासाठी पोटगी मिळाली आहे. लग्नाचे फोटो व पुरावे मी मिडीयावर टाकणार आहे, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.
मुंडे यांच्या विरोधात बोलल्यास माझ्या मुलीला उचलून नेण्याची धमकी दिली जात आहे. शिवानीला उचलून नेण्याची धमकी मला त्यांचे लोक देत आहेत. मी या प्रकरणात तक्रारही केली आहे. मी तक्रार करून पाच ते सहा दिवस झाले आहेत. व्हॉटसअपवर मला धमकी दिली जात आहे, असा आरोपही करुणा शर्मा यांनी केला आहे.
Conspiracy to pay him 20 lakhs if he cheats me in love trap, Karuna Sharma accuses Munde gang
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis महसूल विषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी 15 ऑगस्टपासून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- Raj Thackeray : मराठीचा आग्रह धरा, पण आंदोलन थांबवा, राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश
- Hasan Mushrif : पुण्यासारख्या घटना टाळण्यासाठी ‘महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना’ लागू करा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी
- Sanjay Raut संजय राऊत यांनी सोडली टीकेची पातळी, मोदी शहांचा मियाँ म्हणून उल्लेख